पांढऱ्या प्रवासी गाड्यांना आवर घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:12 AM2018-05-19T01:12:21+5:302018-05-19T01:12:21+5:30
आम्ही वर्षाचे ४० ते ५० हजार रुपये शासनाला टॅक्स भरून रितसर परवाना घेऊन प्रवासी वाहतूक करतो. पण तरीही आमच्यावरच पोलीस कारवाई करतात आणि विनापरवाना चालणाऱ्या पांढऱ्या प्रवासी वाहनांना सूट दिली जाते, हे असे का?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आम्ही वर्षाचे ४० ते ५० हजार रुपये शासनाला टॅक्स भरून रितसर परवाना घेऊन प्रवासी वाहतूक करतो. पण तरीही आमच्यावरच पोलीस कारवाई करतात आणि विनापरवाना चालणाऱ्या पांढऱ्या प्रवासी वाहनांना सूट दिली जाते, हे असे का? त्यांच्याकडून पोलिसांना जास्त हप्ता मिळतो म्हणून हा प्रकार सुरू आहे का? असे प्रश्न करत काळीपिवळी वाहनधारकांनी शुक्रवारी आपला संताप व्यक्त केला.
यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी, परिवहन अधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात देऊन सहकुटुंब उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.
जिल्ह्यात अनेक मार्गांवर काळीपिवळी जीपमधून प्रवासी वाहतूक केली जाते. त्यासाठी ते परिवहन विभागाकडे टॅक्स भरून रितसर परवानाही घेतात. पण एक-दोन प्रवासी जास्त बसविले तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. दुसरीकडे विनापरवाना चालणाºया पांढºया रंगाच्या प्रवासी जीपगाड्यांनी कितीही नियम मोडले तरी त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते, असा आरोप काळी-पिवळी टॅक्सी मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत केला. सदर कारवाया वडसा आणि कुरखेडा पोलीस ठाण्यांकडूनच जास्त प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पांढºया गाड्यांवर कारवाई होत नसेल तर आम्हीही त्यांच्याप्रमाणे टॅक्स न भरता विनापरवाना गाड्या चालवायच्या का? असाही सवाल त्यांनी केला आहे. काळी-पिवळी टॅक्सी मालकांच्या परिस्थितीचा विचार करून सदर अनधिकृत गाड्यांसोबतच छत्तीसगडी ट्रॅव्हल्स बसगाड्या आणि विनापरवाना चालणाऱ्या काळी-पिवळी गाड्या बंद करण्याचे आदेश वरिष्ठांनी द्यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.
पत्रपरिषदेला दुर्गेश्वर सोनटक्के, विनोद डाहाके, श्याम थोटे, रुपेश बल्लारी, जगदीश मेश्राम, लियाकत सय्यद, गणपत ताराम आदी अनेक जण उपस्थित होते.