विजेच्या धक्क्याने गायी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:32 PM2018-06-11T23:32:00+5:302018-06-11T23:32:13+5:30
तालुक्यातील लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेल्या विजेच्या खांबावरील इन्सुलेटर तुटल्याने विजेचा धक्का लागून दोन गायी ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेल्या विजेच्या खांबावरील इन्सुलेटर तुटल्याने विजेचा धक्का लागून दोन गायी ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली.
लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेले वीज खांब मागील एक वर्षापासून तुटले होते. वीज खांब तुटले असल्याने वीज कर्मचारी खांबावर चढत नव्हते. इन्सुलेटरही काही प्रमाणात तुटले होते. मात्र खांबावरच चढता येत नसल्याने वीज कर्मचारी इन्सुलेटरही बदलवित नव्हते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक इन्सुलेटर जमिनीवर साचलेल्या पाण्यात पडले. इन्सुलेटर पडल्याने पाण्यात प्रवाह सुरू होता. गायी जाताच त्यांना विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडल्या. घटनास्थळ हे गावातच आहे. मात्र सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. ठार झालेल्या गायी नरेंद्र मडावी व गजानन शेडमाके यांच्या मालकीच्या आहेत. पोलीस पाटील किरमा मडावी यांनी घटनेचा पंचनामा केला.
तुटलेला खांब बदलवावा, याबाबत गावकऱ्यांनी अनेकवेळा स्थानिक कर्मचाºयांना विनंती केली होती. मात्र वीज कर्मचारी व अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. यासाठी जबाबदार असलेल्या वीज कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे. त्याचबरोबर संबंधित लाईनमनच्या वेतनातून कपात करून पशुपालकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.
बेजूर येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठार
तालुका मुख्यालयापासून आठ किमी अंतरावर असलेल्या बेजूर जंगल परिसरात वाघाने गायवर हल्ला केला. यात गाय ठार झाली. सदर घटना शनिवारी घडली. सदर गाय सैनु दुर्वा यांच्या मालकीची आहे. पशुपालकाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे. जंगल परिसरात वाघ आढळल्याने बेजूरवासीयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.