भाकपाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:52 AM2017-08-03T01:52:28+5:302017-08-03T01:53:11+5:30
शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, वीज बिलात वाढलेले कर कमी करण्यात यावे, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, वीज बिलात वाढलेले कर कमी करण्यात यावे, रवी, कासवी व कोंढाळा जंगल परिसरातील हल्लेखोर वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने मंगळवारी आरमोरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
या धरणे आंदोलनात भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, डॉ. महेश कोपुलवार, जिल्हा सहसचिव अमोल मारकवार, किसान सभेचे सचिव देवराव चवळे यांनी आपल्या भाषणातून शासन व प्रशासनाने सदर मागण्यांबाबत तत्काळ शासन व प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. कोपुलवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
यावेळी हरीपाल खोब्रागडे, चंद्रभान मेश्राम, माणिक कुर्वे, मारोती नरूले, अमोल दामले, प्रशांत खोब्रागडे, गुलाब नारनवरे, हिरालाल येरमे, केशव ठाकरे, रसिका मरप्पा, रेशमा नारनवरे, हिरालाल येरमे, केशव ठाकरे, रशिका मराप्पा, रेशमा नारनवरे, मंदा कामथे, संघमित्रा तामसटवार, जगदीश मेश्राम यांच्यासह विविध गावातील नागरिक व भाकपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आहेत मागण्या
शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव शेतमालाला द्यावा, एपीएल, बीपीएल असा भेद न करता रेशनच्या दुकानातून सर्वांना धान्य देण्यात यावे, रवी परिसरातील हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करावा, वाघाच्या हल्ल्यातील मृतकाच्या कुटुंबीयांना व जखमींना तातडीने आर्थिक मदत द्यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.