दक्षिण भागातही पोहोचले फसव्या योजनेचे लोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 01:31 AM2019-03-02T01:31:21+5:302019-03-02T01:32:23+5:30

बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेंतर्गत मुलीचे आधार कार्ड व बँक पासबूकची झेरॉक्स तसेच एक साधा अर्ज दिल्ली येथे पाठविल्यानंतर संबंधित खात्यावर दोन लाख रुपये जमा केले जातात, अशी अफवा गडचिरोली शहरात पसरली होती.

Cracked scheme loans reached south | दक्षिण भागातही पोहोचले फसव्या योजनेचे लोन

दक्षिण भागातही पोहोचले फसव्या योजनेचे लोन

Next
ठळक मुद्देकारवाईची गरज : बेटी बचाओ, बेटी पढाओच्या नावावर नागरिकांची लूट, योजना नसल्याचे फलक आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा/आष्टी : बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेंतर्गत मुलीचे आधार कार्ड व बँक पासबूकची झेरॉक्स तसेच एक साधा अर्ज दिल्ली येथे पाठविल्यानंतर संबंधित खात्यावर दोन लाख रुपये जमा केले जातात, अशी अफवा गडचिरोली शहरात पसरली होती. आता ही अफवा जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये सुध्दा पसरली आहे. अर्ज भरण्यासाठी आष्टी, सिरोंचा येथील पोस्ट कार्यालयांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
गडचिरोली शहरात एक महिन्यापूर्वी या योजनेची अफवा पसरली होती. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही केंद्र शासनाची योजना असली तरी या योजनेंतर्गत पैसे देण्याची कोणतीच तरतूद नाही हे अधिकाऱ्यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे.
तरीही काही नागरिक अर्ज करण्यासाठी पोस्टाच्या कार्यालयात रांगा लावत आहेत. दिवसभराची मजुरी बुडवून अर्ज करण्यासाठी पोस्टामध्ये येत आहे.आष्टी येथील पोस्ट कार्यालयात इल्लूर, ठाकरी, आष्टी, अनखोडा, कुनघाडा, मार्र्कंडा, उमरी आदी गावातील नागरिक अर्ज करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे येथील पोस्ट कार्यालयात मोठी गर्दी होत आहे.
झेरॉक्स सेंटरवर कारवाई होणार का?
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील झेरॉक्स सेंटर दुकानदाराने एक महिन्याच्या कालावधीत अशा पद्धतीच्या खोट्या योजनेचे अर्ज विकून लाखो रुपयांची कमाई केली. एक लिपाफा व एका अर्जाची झेरॉक्स असा दोन रुपयाला पडणारा अर्ज १० रुपयाला विकल्या जात होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलिसांनी असे फसवे अर्ज विक्री न करण्याची तंबी दिली. त्यानंतर गडचिरोली येथील त्या दुकानदाराने अर्जाची विक्री बंद केली.
च्हीच पध्दती आता दक्षिण भागात असलेल्या तालुक्यामधील झेरॉक्स सेंटर दुकानदारांनी अवलंबिली आहे. त्यामुळे या दुकानदारांना अशा प्रकारचे फसवे अर्ज विक्री न करण्याची तंबी दिली जाते का, याकडे सूज्ञ नागरिकांचे लक्ष आहे. तसेच अशा प्रकारची कोणतीही योजना नाही, असे फलक पोस्ट कार्यालयासमोर लावणे आवश्यक झाले आहे. अन्यथा पुन्हा हजारो नागरिक या फसव्या योजनेत फसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा प्रकारची कोणतीही योजना नाही. नागरिकांनी स्वत:चा वेळ व पैसा अशा अनावश्यक कामामध्ये खर्च करू नये, एखाद्या व्यक्तीने अफवा पसरविली असून या अफवेला नागरिकांनी बळी पडू नये. बँक खात्याच्या पासबूक व आधार कार्डाची झेरॉक्स पाठविले जात आहे. ही माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- एस.एस. सय्यद,
प्रभारी तहसीलदार सिरोंचा

Web Title: Cracked scheme loans reached south

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.