व्यसनमुक्त समाज निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:26 AM2018-03-29T01:26:15+5:302018-03-29T01:26:15+5:30

Create an addictive society | व्यसनमुक्त समाज निर्माण करा

व्यसनमुक्त समाज निर्माण करा

Next
ठळक मुद्देदिलीप चौधरी यांचे प्रतिपादन : चाकलपेठ येथे समाजप्रबोधन कार्यक्रम

ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : समाजात दिवसेंदिवस व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून बलशाली, सशक्त निर्व्यसनी समाज निर्माण करण्याची गरज आहे. निकोप समाजच प्रगती साधत असल्याने नागरिकांनी व्यसनमुक्त समाजासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन वक्ते प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.
चाकलपेठ येथील संभाजी ब्रिगेड शाखेच्या वतीने सोमवारी समाजप्रबोधन कार्यक्रमात ‘भारतीय समाजासमोरील आव्हाने व उपाय’ या विषयावर ते बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रमोद चुधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच धनराज खेडेकर, ग्रा. पं. सदस्य नामदेव किनेकार, वंदना मडावी, उर्मिला देशमुख, लता चुधरी, संगीता चरडुके, पोलीस पाटील ज्योती मडावी, तंमुस अध्यक्ष गुणाजी भिवनकर, शालू पाल, बापुजी धानोरकर, मुख्याध्यापिका नंदा कोत्तावार, ग्रामसेवक धनंजय शेंडे, बोबाटे, विकास तुंबडे, पंकज पाल उपस्थित होते. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील व्यसनाधीनता अधोगतीला कारणीभूत आहे. भावीपीढीला सक्षम बनविण्यासाठी बालमनावर चांगले संस्कार करावे, असे आवाहनही प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास तुंबडे, संचालन पंकज पाल तर आभार हंसराज रामगिरवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी अशोक कुकडकार, गणपती भिवनकर, मिलींद किनेकार, खुशाल मंडोगडे, उमाकांत चुधरी, हिवराज पाल, दामोधर घोडे, विकास पाल, संतोष किनेकार, वंदना म्हस्के, कविता झाडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Create an addictive society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.