अल्पसंख्यांकांच्या योजनांबाबत जनजागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:33 PM2019-02-15T23:33:02+5:302019-02-15T23:33:35+5:30
१५ कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक नागरिक व विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी शुक्रवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १५ कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक नागरिक व विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी शुक्रवारी दिले.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आज गडचिरोली दौºयावर आले असता, त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींची भेट घेतली. तसेच सर्व विभागाच्या प्रमुखांची कामासंदर्भात आढावा बैठक विश्रामगृहात आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस. आर. पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, ए.आर. लांबतुरे, उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश उचे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. शरदचंद्र पाटील, समाजकल्याण निरीक्षक मेश्राम, तहसिलदार वासनिक, तहसीलदार दयाराम भोयर, सहाय्यक नियोजन अधिकारी सुनिल पाटील, समाज कल्याणचे सारंग पाटील, स्वंयरोजगार व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी शेंडे आदी उपस्थित होते.
अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरिता पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग सुरु करणे, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना, अल्पसंख्यांक शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभू सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनांचा आढावा घेतला.
अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये शिकणाºया गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश अभ्यंकर यांनी दिले.
रमाई घरकूल योजनेंतर्गत ६ हजार ८०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार अर्जांना मंजुरी दिली आहे. अल्पसंख्यांक समाजातील ५४० युवकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाºयांनी अभ्यंकर यांना आढावादम्यान दिली.