अपघातमुक्त जिल्हा अशी ओळख निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:38 AM2021-01-19T04:38:00+5:302021-01-19T04:38:00+5:30
गडचिराेली : रस्ता व सुरक्षा नियमांचे पालन करून अपघातमुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ...
गडचिराेली : रस्ता व सुरक्षा नियमांचे पालन करून अपघातमुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले आहे. जिल्ह्यात रस्ता सुरक्षेची जागृती करण्यासाठी पाेलीस व परिवहन विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाचा शुभारंभ १८ जानेवारी राेजी करण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मार्गदर्शन करीत हाेते.
वाहनांची संख्या वाढल्याने मागील काही वर्षांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश अपघातांमध्ये वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
फाेटाे : कार्यक्रमाला उपस्थित एआरटीओ रवींद्र भुयारी व अन्य.