स्वयंशिस्त निर्माण करणे शिक्षकांचे आद्य कर्तव्य

By admin | Published: October 17, 2015 02:01 AM2015-10-17T02:01:35+5:302015-10-17T02:01:35+5:30

विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण करणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.

Creating a self-employed Teacher's pioneering duty | स्वयंशिस्त निर्माण करणे शिक्षकांचे आद्य कर्तव्य

स्वयंशिस्त निर्माण करणे शिक्षकांचे आद्य कर्तव्य

Next

कुलगुरूंचे प्रतिपादन : डायटच्या प्रशिक्षणाला भेट
गडचिरोली : विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण करणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.
सोमवारपासून येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये २४ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी निवडश्रेणी प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाला शुक्रवारी कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे प्रभारी प्राचार्य तथा ज्येष्ठ अधिव्याख्याता रवींद्र रमतकर होते. डायटचे धनंजय चापले, डॉ. विनीत मत्ते, दीपक मेश्राम, प्रवीणकुमार पाईकराव, डॉ. विजय शिंदे, डॉ. नरेश वैद्य आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी विद्यार्थी विकासाची मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्तपणा रूजला पाहिजे. शालेय शिक्षणातून सुजाण व जागृत नागरिक निर्माण होणे ही काळाची गरज आहे, असेही डॉ. कल्याणकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनीत मत्ते, संचालन सहाय्यक प्रशिक्षण प्रमुख चांगदेव सोरते यांनी केले तर आभार डी. एस. मेश्राम यांनी मानले. यावेळी ४९ प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Creating a self-employed Teacher's pioneering duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.