क्रेडिट कार्डधारकांना मिळणार सुविधांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:26+5:30
पीएम किसान योजनेमार्फत शेतकºयांना कर्ज पुरवठा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाकडून प्रशासन व बँकांना प्राप्त झाल्या आहेत. विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पीएम किसान लाभार्थ्यांनी किसान क्रेडीट कार्डमार्फत सुविधा द्याव्यात, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. क्रेडीट कार्डधारक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले.

क्रेडिट कार्डधारकांना मिळणार सुविधांचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील १ कोटी ६८ लाख किसान क्रेडीट कार्डधारक शेतकºयांना कर्ज सुविधेचा लाभ मिळणार आहे. किसान क्रेडीट कार्डवरून पात्रतेनुसार ३ लाखापर्यंतचे कर्ज (अर्थसहाय्य) त्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत दिली.
पीएम किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाकडून प्रशासन व बँकांना प्राप्त झाल्या आहेत. विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पीएम किसान लाभार्थ्यांनी किसान क्रेडीट कार्डमार्फत सुविधा द्याव्यात, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. क्रेडीट कार्डधारक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले.
जिल्ह्यात २३ फेब्रुवारी २०२० पर्यंत १५ दिवस तालुका व गावस्तरीय बैठकांमधून शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड घेण्याबाबत माहिती दिली जाणार आहे. किसान क्रेडीट कार्डमार्फत केल्या जाणाऱ्या कर्जवाटपात १ लाख ६० हजार रुपयापर्यंतच्या कर्जाला कोणत्याही प्रकारची हमी शेतकऱ्यांना सादर करावी लागणार नाही. १ लाख ६० हजार ते ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी प्रक्रिया खर्च, कागदपत्र खर्च, तपासणी सेवा शुल्क तसेच इतर आकार बँकांमार्फत माफ केले जाणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बँकांमार्फत किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे.
एकाच पानाचा राहणार अर्ज
किसान क्रेडीट कार्डधारक शेतकऱ्यांना विविध कर्ज मागणीसाठी सर्वंच बँकांकरिता एका पानाच्या अर्जाचा नमुना इंडियन बँक्स असोसिएशनमार्फत तयार करण्यात आला आहे. सदर अर्ज सर्व बँक शाखा तसेच सेवा सहकारी सोसायट्या व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. कर्ज मागणीच्या अर्जासोबत शेतकऱ्यांना कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र, सातबारा व पीक पेऱ्याचा तपशील आदी दस्तावेज जोडावे लागणार आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या बँक शाखेत, सेवा सोसायटी कार्यालयात भेट द्यावी, असे जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद भोसले यांनी सांगितले.
मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धनासाठी वाढीव कर्ज देणार
ज्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड आहे, अशा शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसान मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसायासाठी वाढीव कर्ज मर्यादा मंजूर करण्यात येणार आहे. किसान क्रेडीट कार्ड असूनही काही शेतकरी त्याचा वापर करीत नाही. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे किसान क्रेडीट कार्डचे खाते क्रियाशील केले जाणार आहे, अशी माहिती सदर बैठकीत अधिकाºयांनी दिली.