कृउबासच्या सभापतीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:02 AM2018-03-13T00:02:39+5:302018-03-13T00:02:39+5:30
तेलंगणातील वाळू कंत्राटदार किसनरेड्डी यांच्या तक्रारीवरून आसरअल्ली पोलिसांनी सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा अंकिसा ग्रामपंचायतीचे उपसरपंच येनगंटी व्यंकटेश्वर किसनराव यांच्या विरूध्द भादंविचे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आॅनलाईन लोकमत
सिरोंचा : तेलंगणातील वाळू कंत्राटदार किसनरेड्डी यांच्या तक्रारीवरून आसरअल्ली पोलिसांनी सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा अंकिसा ग्रामपंचायतीचे उपसरपंच येनगंटी व्यंकटेश्वर किसनराव यांच्या विरूध्द भादंविचे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
६ मार्च रोजी येनगंटी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आरोपी येनगंटी फरार आहे, अशी माहिती आसरअल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दराडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
प्राप्त माहितीनुसार तेलंगणाच्या हैदराबाद येथील कंत्राटदार किसन रेड्डी व अंकिसा येथील व्यंकटेश्वर येनगंटी यांनी संयुक्तरित्या सिरोंचा तालुक्यातील एक रेती घाट लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन घेतला. दरम्यान किसन रेड्डी यांनी आपल्या वाट्याचे जवळपास ४ कोटी रूपये व्यंकटेश्वर येनगंटी यांच्या बँक खात्यात जमा केली. रेती घाटावरील वाळू विक्रीनंतर येनगंटी यांनी किसनरेड्डी यांना त्यांचे चार कोटी रूपये परत केले नाही. किसन रेड्डी यांनी येनगंटीला वारंवार विचारणा केली. मात्र त्यांना त्यांचे यश आले नाही. त्यानंतर येनगंटी यांनी अंकिसा येथील आपले राहते घर व सर्व संपती किसनरेड्डी यांना त्यांनी दिलेल्या पैशाच्या बदल्यात लिहून दिली होती. मात्र त्या येनगंटी याने लिहून दिलेल्या स्टॅम्पची मुदत संपली. त्यानंतर किसनरेड्डी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून येनगंटीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.