चामोर्शी तालुक्यात गुन्हेगारी घटली

By admin | Published: January 2, 2017 02:00 AM2017-01-02T02:00:57+5:302017-01-02T02:00:57+5:30

सन २०१६ या वर्षात चामोर्शी पोलीस ठाण्यांतर्गत दारूविक्री प्रकरणाचे एकूण २६० गुन्हे दाखल करण्यात आले असून

Crime decreased in Chamorshi taluka | चामोर्शी तालुक्यात गुन्हेगारी घटली

चामोर्शी तालुक्यात गुन्हेगारी घटली

Next

अपघाती मृत्यूंमध्ये वाढ : वर्षभरात चामोर्शी पोलिसांनी ९७ लाख ८६ हजारांच्या दारूसह मुद्देमाल पकडला
लोमेश बुरांडे ल्ल चामोर्शी
सन २०१६ या वर्षात चामोर्शी पोलीस ठाण्यांतर्गत दारूविक्री प्रकरणाचे एकूण २६० गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी २८३ दारूविक्रेत्या आरोपींवर कारवाई केली आहे. १० चारचाकी वाहने, १७ दुचाकी, ७ सायकल, १ डोंगा अशा मुद्देमालासह एकूण ९७ लाख ८६ हजार ९८१ रूपयांची दारू जप्त करण्यात आली. सन २०१६ मध्ये घरफोडी, चोरी, पळवून नेणे व इतर गुन्ह्यांचे प्रमाण सन २०१५ च्या तुलनेत कमी झाले आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत सन २०१६ मध्ये अपघाती मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
चामोर्शी पोलीस ठाण्यातर्फे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये २०१६ मध्ये पाच इसमांविरूद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून यापैैकी सपन सतीश मंडल रा. कुनघाडा याला गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे. अवैैध दारूविक्री करणाऱ्या एकूण २४ इसमांवर मुंबई दारूबंदी कायद्याचे कमल ९३ अन्वये चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कलम १४४ (२) सीआरपीसी अन्वये एकूण २९ इसमांविरूद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
सन २०१६ मध्ये चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता झालेल्या एकूण २० व्यक्तींपैैकी १६ व्यक्तींना शोधून काढण्यात चामोर्शी पोलिसांना यश आले. बेपत्ता ४ व्यक्ती अद्यापही सापडले नाही. न्यायालयातून एकूण १७८ गुन्ह्यांच्या निकालापैैकी ७८ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून शिक्षेचे प्रमाण ४४ टक्के आहे. २०१६ मध्ये एकूण ७८ गुन्ह्यांमध्ये आरोपींविरोधात दोषारोप सिद्ध झाले असून त्यांना शिक्षा झाली आहे.
चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दित एकूण ८७ गावांचा समावेश असून ३८ ग्राम पंचायती समाविष्ठ आहेत. यामध्ये महिला दारूबंदी समिती ५४ तसेच चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दितील पोलीस पाटलांची संख्या ५५ आहे.
२०१६ या वर्षात मोटारवाहन अपघातात आठ इसम मृत्यूमुखी झाले असून यात यंदा तीन गुन्ह्याने वाढ झाली आहे.

वर्षभरातील गुन्हेगारीचा आलेख
४चामोर्शी पोलीस ठाण्यात सन २०१६ मध्ये हत्येचे दोन गुन्हे दाखल असून यात एक नक्षलहत्या गुन्ह्याचा समावेश आहे. खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे दाखल असून यात दोन नक्षलगुन्हे आहेत. बलत्काराचे तीन गुन्हे दाखल असून गतवर्षी २०१५ मध्ये बलत्काराचे आठ गुन्हे दाखल झाले होते. गतवर्षी चोरी-घरफोडीचे एकूण २८ गुन्हे दाखल होते. २०१६ मध्ये २३ गुन्हे दाखल आहेत. दुखापतीचे गतवर्षी ३३ तर २०१६ मध्ये दहा गुन्हे दाखल आहेत. सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ल्याचे दोन गुन्हे दाखल असून गतवर्षीपेक्षा या गुन्ह्यांमध्ये दोन ने घट झाली आहे. विनयभंगाचे पाच गुन्हे दाखल असून गतवर्षी नऊ गुन्हे दाखल होते. यात चार ने घट झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाण्याच्या हद्दितील गावागावांत दारूबंदी समिती तयार करण्यात आली. शिवाय गावात पोलीस पाटील व तंटामुक्त समित्या कार्यरत असल्याने अवैैध दारूविक्रीवर धडक मोहीम राबविल्यामुळे अवैैध दारूविक्रेत्यांना चाप बसला. परिणामी दारूमुळे होणारी गावात भांडणतंटे व गुन्हेगारी यांच्यात घट झाली असून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दित कमी झाले आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. २०१७ वर्षातही अवैध दारूविक्रेत्यांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येणार असून इतर गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
- किरण अवचर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, चामोर्शी

Web Title: Crime decreased in Chamorshi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.