सगुणा प्रक्षेत्रातील पीक जोमात
By admin | Published: September 10, 2016 01:20 AM2016-09-10T01:20:59+5:302016-09-10T01:20:59+5:30
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या पुढाकाराने जिल्ह्यात सगुणा पद्धतीने लागवड केलेल्या धानपीक
आत्माची भेट : चर्चासत्रात शेतकऱ्यांना संवर्धनाची दिली माहिती
गडचिरोली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या पुढाकाराने जिल्ह्यात सगुणा पद्धतीने लागवड केलेल्या धानपीक प्रक्षेत्राची पाहणी चंद्रशेखर भळसावळे यांच्या उपस्थितीत साखरा येथे नुकतीच करण्यात आली. यावेळी कृती प्रात्यक्षिक घेण्यात आले.
आरमोरी तालुक्यातील सुकाळा येथे चार शेतकऱ्यांच्या शेतीलाही भेट देण्यात आली. यावेळी माविमच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, व्ही. डी. राहांगडाले, चारदुत्त वाढई, यामिनी मातेरे, सुषमा नरूले, महावंता कोटांगले, अनिता नवघरे, सुनीता भानारकर, सुरेश बावनकर व शेतकरी उपस्थित होते. यावेळी मृदा संवर्धन, उत्पादनवाढ, नियोजन याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. (प्रतिनिधी)