लोहारा भागातील धान पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 01:33 AM2018-10-31T01:33:54+5:302018-10-31T01:34:21+5:30

तालुक्यातील लोहारा-कोजबी परिसरातील धानपिक पाण्याअभावी करपल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.

The crops of the Lohra area have cropped up | लोहारा भागातील धान पीक करपले

लोहारा भागातील धान पीक करपले

Next
ठळक मुद्देदुष्काळसदृश स्थिती : सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील लोहारा-कोजबी परिसरातील धानपिक पाण्याअभावी करपल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.
यंदा पावसाची सुरूवात समाधानकारक झाल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आपली दिवाळी धान विक्री करून आनंदात जाईल असे वाटत होते. मात्र शेवटच्या टप्प्यात पाणी न पडल्याने धान पीक करपले. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्यावर संकट ओढावले. आरमोरी तालुक्यातील लोहारा परीसरात सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने शेतकरी जास्तीत जास्त पावसाच्या पाण्यावर धान पीक घेतात. ऐनवेळी निसर्गाने घात केल्याने व परिसरात सिंचनाची सोय नसल्याने शेतकºयांचे धान पूर्णत: करपून गेले. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शासनाने नुकसान ग्रस्त शेतकºयांच्या धान पिकांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आदिवासी काँग्रेस कमिटी सचिव दिलीप घोडाम यांच्यासह शेतकरी भाऊराव मडावी, लक्ष्मण म्हशाखेत्री, रामचंद्र थोरात, सुनील ताडाम, ज्ञानेश्वर गेडाम, प्रल्हाद गेडाम, गोपीनाथ मानकर, निकेश फुलबांधे, सुनील फुकटे, श्रावण मडावी, कमल फरटे, मंगला मुराडे यांच्यासह परिसरातील शेतकºयांनी प्रशासनाकडे केली आहे.
 

Web Title: The crops of the Lohra area have cropped up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.