अड्याळ केंद्रावरील कोट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:27 AM2021-05-28T04:27:08+5:302021-05-28T04:27:08+5:30

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात धान व मका उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून ...

Crores of rupees worth of grain destroyed at Adyal Kendra | अड्याळ केंद्रावरील कोट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी

अड्याळ केंद्रावरील कोट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी

Next

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात धान व मका उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून धान खरेदी केंद्रावर आ. डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली असता तेथील अत्यंत धक्कादायक परिस्थिती समोर आली. मागील वर्षीपासून या केंद्रावरील उघड्यावर असलेल्या धानाची उचल न केल्यामुळे येथील कोट्यवधी रुपयांचे धान सडल्याचे निदर्शनास आले. दरवर्षी अशा प्रकारे जाणीवपूर्वक कोट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी करण्यात येत असल्याने खरेदी केंद्रावरील धानाच्या नासाडीला आर.एम. व एस.आर.एम.आर. हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करावे व येथील धानाची तातडीने उचल करावी तसेच मका व धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आ. होळी यांनी केली. चामाेर्शी तालुक्यात मागील ५ वर्षांत धान, मका व भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. सिंचनाची साेय झाल्यानंतर प्रत्येक शेतकरी उन्हाळी पिकांची लागवड करताे; परंतु त्याच्या मालाला भाव मिळत नसल्याने काहीसा हिरमाेड हाेत आहे.

बाॅक्स

मका उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

मागील वर्षीपासून जिल्ह्यात आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात मका लागवड क्षेत्रात माेठ्या प्रमाणात वाढ झाली. याही वर्षी आधारभूत किमतीत मका खरेदी केंद्र सुरू हाेईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना हाेती; परंतु तसे झाले नाही. १ मेपासून आधारभूत मका व रबी धान खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक हाेते; परंतु अद्यापही धान व मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने मका उत्पादक शेतकरी सर्वाधिक चिंताग्रस्त आहेत.

===Photopath===

260521\4333img-20210526-wa0193.jpg

===Caption===

घड्याळ केंद्रावरील झालेली धान्याची नासाडी

Web Title: Crores of rupees worth of grain destroyed at Adyal Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.