बाबलाई महोत्सवात उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:03 AM2019-01-02T01:03:24+5:302019-01-02T01:04:57+5:30
१ ते ३ जानेवारीपासून या कालावधीत भामरागड तालुक्यातील बेजूर येथे बाबलाई माता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळली असून २ जानेवारीपासून पूजा व इतर कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : १ ते ३ जानेवारीपासून या कालावधीत भामरागड तालुक्यातील बेजूर येथे बाबलाई माता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळली असून २ जानेवारीपासून पूजा व इतर कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे.
भामरागड तालुक्यातील बेजूर येथील बाबलाई माता महोत्सव हा प्रसिध्द आहे. या महोत्सवाला भामरागड तालुक्यातील आदिवासीसह सर्वच जातीधर्मातील नागरिक जातात. नजिकच्या छत्तीसगड राज्यातीलही भाविक या ठिकाणी येतात. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दी उसळते. महोत्सवाला १ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. बाबलाई मातेची पूजा २ जानेवारी रोजी होणार आहे. पुजेनंतर दुपारी भामरागड पट्टीतील सर्व पेरमा, भुमीया, गायता, कोतवाल, मांजी, समाजातील अभ्यासक, विद्यार्थी यांचे चर्चासत्र होईल. आदिवासी प्रथा, परंपरा, संस्कृती तसेच आदिवासींसाठी बनविण्यात आलेले कायदे यावर व्यापक चर्चा होईल. ३ जानेवारी रोजी बाबलाई मातेची जत्रा भरेल. गडी सकाळच्या सुमारास गडीदेव येथे पूजा केली जाईल. याच दिवशी समारोप होईल. बाबलाई माता महोत्सवाचे आयोजन भामरागड पट्टी गोटूल समिती व सर्व ग्रामसभांनी केले आहे.