समक्का सारक्का यात्रेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:37 PM2018-02-03T23:37:32+5:302018-02-03T23:37:43+5:30

आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या समक्का सारक्का देवीचे मंदिर कमलापूर येथे मामा तलावाजवळ आहे. येथे मंदिर मंडळाच्या वतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात्रेदरम्यान शेकडो भाविकांनी हजेरी लावून समक्का सारक्का देवीचे दर्शन घेतले.

The crowd gathered at Sakka Sarakka Yatra | समक्का सारक्का यात्रेत गर्दी

समक्का सारक्का यात्रेत गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देकमलापुरात भाविकांचे जत्थे : अनेकांनी घेतले देवीचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या समक्का सारक्का देवीचे मंदिर कमलापूर येथे मामा तलावाजवळ आहे. येथे मंदिर मंडळाच्या वतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात्रेदरम्यान शेकडो भाविकांनी हजेरी लावून समक्का सारक्का देवीचे दर्शन घेतले.
३१ जानेवारीला सारक्का देवीचे आगमण व भजन किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर १ जानेवारीला कंकावनम व बोनालू आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले. याच दिवशी अनेक भाविकांनी बोलले नवस पूजा-अर्चा करून फेडले. सांबय्याजी रालाबंडीवार यांनी येथे आलेल्या भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था होण्यासाठी सदर मंदिर मंडळाला आपली मंदिरालगतची जमीन दान केली. सदर यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व इतर समाजातील व धर्मातील भाविकांनी हजेरी लावली होती. यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Web Title: The crowd gathered at Sakka Sarakka Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.