शस्त्रक्रियेसाठी लोकबिरादरीत रूग्णांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:17 PM2018-01-12T23:17:54+5:302018-01-12T23:20:04+5:30
हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात शुक्रवारी व शनिवारी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ग्रामीण व दुर्गम भागातील रूग्ण तसेच छत्तीसगड व तेलंगणातील रूग्ण उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात शुक्रवारी व शनिवारी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ग्रामीण व दुर्गम भागातील रूग्ण तसेच छत्तीसगड व तेलंगणातील रूग्ण उपस्थित होते.
दुर्गम भागातील नागरिकांकडे शस्त्रक्रियेसाठी पैसे राहत नाही. मोठ्या शहरांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन लोकबिरादरी प्रकल्पाने शुक्रवारी व शनिवारी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराला दुर्गम भागातील शेकडो रूग्ण सहभागी झाले होते. रूग्णांच्या नातेवाईकांना रोटरी क्लबच्या वतीने मोफत अन्नदान करण्यात आले. ज्या रूग्णांवर शस्त्रक्रिया झाली. अशा रूग्णांना मोफत औषधोपचारही करण्यात आला. लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येते. शुक्रवारी दिवसभर डॉक्टरांच्या चमूने रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. रूग्णांची संख्या अधिक असल्याने शस्त्रक्रिया शनिवारीसुद्धा दिवसभर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकबिरादरी प्रकल्पाच्यावतीनेही आवश्यक सुविधा पुरविल्या आहेत.