फुटपाथवरील गर्दीने धाेका वाढतीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:23+5:302021-03-06T04:34:23+5:30
गडचिराेली : गडचिराेली शहराची लाेकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने अनेक छाेट्या-माेठ्या व्यावसायिकांनी गडचिराेलीत मिळेल त्या ठिकाणी ...
गडचिराेली : गडचिराेली शहराची लाेकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने अनेक छाेट्या-माेठ्या व्यावसायिकांनी गडचिराेलीत मिळेल त्या ठिकाणी दुकाने लावली आहेत. लाेकसंख्या वाढली, वाहने वाढली. मात्र, रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. दरम्यान, फुटपाथवरील दुकानांची संख्या वाढल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. फुटपाथ दुकानावर नागरिकांची गर्दी हाेत असल्याने काेराेना व अपघाताचा धाेका बळावला आहे.
गडचिराेली येथील इंदिरा गांधी चाैकात पूर्वीच्या तुलनेत आता हातठेल्यांची संख्या वाढली आहे. चहा व नाश्ता तसेच इतर पदार्थांची विक्री येथे केली जाते. इंदिरा गांधी चाैकातून चारही मुख्य मार्ग जातात. चामाेर्शी, धानाेरा, आरमाेरी, मूल या चारही मुख्य मार्गावरील फुटपाथवर पाेटाची खळगी भरण्यासाठी अनेकांनी व्यवसाय सुरू केले आहेत. शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम ज्या ठिकाणी पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणच्या नालीवर बऱ्याच जणांनी नव्याने छाेट-माेठे दुकान लावले आहेत. मात्र, या दुकानांवर ग्राहकांची गर्दी हाेत असल्याने काेराेना संसर्गाचा धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.