गडचिरोलीत सीआरपीएफ जवानाने झाडल्या सहकाऱ्यांवर गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 09:41 AM2018-03-07T09:41:24+5:302018-03-07T09:58:09+5:30

नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ बटालियनच्या एका जवानाने आपल्याच दोन सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

CRPF jawan fired rounds on colleagues in Gadchiroli | गडचिरोलीत सीआरपीएफ जवानाने झाडल्या सहकाऱ्यांवर गोळ्या

गडचिरोलीत सीआरपीएफ जवानाने झाडल्या सहकाऱ्यांवर गोळ्या

Next
ठळक मुद्देसीआरपीएफ जवानाने झाडल्या दोन जवानांवर गोळ्यागडचिरोलीतील एटापल्लीमधला धक्कादायक प्रकार

गडचिरोली - नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ बटालियनच्या एका जवानाने आपल्याच दोन सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री (6 मार्च) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गोळीबार करणारा जवान संजय शेंदरे याला ताब्यात घेण्यात आले आहे. शेंदरे यांनी केलेल्या गोळीबारात एस.एन. इंगळे आणि विलास संघपाल हे दोन जवान जखमी झाले आहेत.

यातील एका जवानाच्या पायाला तर दुसऱ्याच्या पोटाला गोळी लागली. दोघांनाही अहेरीच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर चंद्रपूर आणि नंतर नागपूरला हलवण्यात आले. या तीन जवानांमध्ये यापूर्वीही वैयक्तिक कारणांवरून वाद झाला होता. तिघेही हवालदार पदावर कार्यरत आहेत.

या घटनेत जवानाच्या हातून चुकून तीन राऊंड फायर झाल्याचे सीआरपीएफचे म्हणणे आहे. त्यामुळे याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जखमी जवानांच्या बयाणानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती एटापल्लीचे पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी दिली आहे.  

Web Title: CRPF jawan fired rounds on colleagues in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस