५० हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:01:03+5:30

वैरागड परिसरातील शेतकरी फार पूर्वीपासून धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या भागातील शेतामध्ये विहीर खोदून तेथे मोटारपंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजीपाला शेती करणाऱ्यांची संख्या १५ वर्षांपूर्वी अत्यल्प होती. त्यानंतरच्या काळात कृषी विभागाच्या विविध योजना, सिंचनाबाबत जनजागृती, अनुदान योजना कार्यान्वित झाल्यानंतर वैरागड भागातील भाजीपाला क्षेत्र वाढले.

Cultivation of vegetables in an area of 50 hectares | ५० हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड

५० हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही हंगामात उत्पादन : वैरागडातील भाजीपाला पोहोचतो चार तालुक्यांच्या बाजारात

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : निव्वळ धानशेतीच्या भरवशावर कुटुंबाची आर्थिक प्रगती होत नाही. हे लक्षात आल्यावर गेल्या पाच-सहा वर्षांपासून वैरागड परिसरात भाजीपाला पिकांच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदाच्या रबी हंगामात वैरागड पंचक्रोशीतील गावांमध्ये ५० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात भाजीपाला व पालेभाज्यांची शेती फुलली आहे.
वैरागड परिसरातील शेतकरी फार पूर्वीपासून धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या भागातील शेतामध्ये विहीर खोदून तेथे मोटारपंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजीपाला शेती करणाऱ्यांची संख्या १५ वर्षांपूर्वी अत्यल्प होती. त्यानंतरच्या काळात कृषी विभागाच्या विविध योजना, सिंचनाबाबत जनजागृती, अनुदान योजना कार्यान्वित झाल्यानंतर वैरागड भागातील भाजीपाला क्षेत्र वाढले. या भागातील शेतकऱ्यांनी नरेगा अंतर्गत तसेच धडक सिंचन विहीर व इतर योजनेतून सिंचन विहिरीचे खोदकाम केले. या विहिरीवर मोटारपंप बसवून येथे बारमाही भाजीपाल्याची शेती केली जात आहे.
या भागातील भाजीपाला कुरखेडा, आरमोरी, धानोरा या तालुका मुख्यालयासह गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जातो. कोरोनाच्या संचारबंदीत प्रशासनाने अत्यावश्यक बाब म्हणून भाजीपाला वाहतुकीला परवानगी दिल्याने वैरागडची प्रसिद्ध असलेली पालक व चवळीची भाजी सद्य:स्थितीत गडचिरोलीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात दररोज येत आहे. वैरागड, मोहझरी, सुकाळा, कोसरी या चारही गावात प्रत्येकी २५ ते ३० भाजीपाला उत्पादक शेतकरी दोन्ही हंगामात भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. सिंचन सुविधा असल्याने या भागातील भाजीपाला हिरवकंच दिसून येत आहे.

फूल शेती तोट्यात
आरमोेरी तालुक्यात वैरागड भागासह बºयाच गावांमध्ये झेंडू व शेवंती फुलाची शेती केली जाते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे लग्न समारंभ रद्द झाले. शिवाय देवालये व मंदिर कुलूपबंद असल्याने फुलांची मागणी फार कमी झाली आहे. लग्न समारंभ नसल्याने गजºयाचा वापर नाही. उत्पादन होऊनही शेवंती व झेंडूच्या फुलांना ग्राहक मिळत नसल्याने ही शेती नुकसानीची ठरत आहे.

Web Title: Cultivation of vegetables in an area of 50 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती