संचारबंदीतही शेती मशागतीची कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:37 AM2021-05-19T04:37:41+5:302021-05-19T04:37:41+5:30
दिनांक १४ मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास वादळ व मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील व ग्रामीण भागातील ...
दिनांक १४ मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास वादळ व मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील व ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करताना शेताच्या बांधावर दिसून येत आहेत. नांगरणीचे प्रतितास आठशे रुपये भाडे आकारले जात आहेत.
कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील काही शेतकरी गेल्या काही दिवसांपासून ट्रॅक्टरच्या साह्याने शेताची नांगरणी, बांधाची दुरुस्ती करणे, सपाटीकरण करणे, शेतजमीन समांतर करणे आदी कामे करीत आहेत. शिवाय काही शेतकरी व त्यांचे कुटुंबीय सकाळपासून शेतीमधील वाळलेले गवत काढत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील बरेच शेतकरी व शेतमजूर दरवर्षी तेंदू संकलनाचे काम करतात. यावर्षीसुद्धा काही दिवस तेंदू संकलनाचे काम केले. लवकरच तेंदूपत्ता संकलनाचे काम बंद पडेल. कोरोनाच्या संचारबंदीमुळे इतर सर्वच कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे रिकाम्या हाताने राहायचे कसे, असा विचार करून बरेच शेतकरी व त्यांचे कुटुंबीय शेतात जाऊन शेती मशागतीचे काम करीत आहेत. उन्हाचा पारा वाढल्यामुळे ही कामे अगदी सकाळच्या सुमारास करण्यावर अधिक भर दिला जात आहे.
===Photopath===
180521\img_20210517_174647.jpg
===Caption===
ट्रॅक्टर द्वारे शेताची नांगरणी