संस्कृती जतनासाठी एकजूट दाखवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:08 PM2018-01-22T23:08:39+5:302018-01-22T23:09:11+5:30
आदिवासी संस्कृती ही प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र बदलत्या काळानुसार आदिवासी आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : आदिवासी संस्कृती ही प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र बदलत्या काळानुसार आदिवासी आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. भविष्यात संस्कृतीचे जतन करून भावी पिढीला प्रेरणादायी संस्कृती ठरेल, याकरिता समाजाने एकत्र यावे, असे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप वरखडे यांनी केले.
अखिल भारतीय गोंडवाना गोंड महासभा जिल्हा शाखा गडचिरोली व राणी हिराई बहुउद्देशीय गोटूल समिती रानखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गोंडीधर्म संमेलनाच्या समारोप प्रसंगी वरखडे बोलत होते.
रानखेडा येथे २० व २१ जानेवारीला सल्लागांगरा शक्तीचे अनावरण व गोंडीधर्म संमेलन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष भारती इष्टाम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गोंडीधर्म महासंघाचे मनीरावण दुगा होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. उमेश मडावी, पत्रकार हरीश सिडाम, गणेश हलामी, रामचंद्र काटेंगे, प्रमुख अतिथी म्हणून घनश्याम मडावी, डंबाजी पेंदाम, पाललाल सिडाम, नाजूकराव जुमनाके, राजीराम कोवे, सुखदेव दुगा, मौशिखांबच्या माजी सरपंच लता सिडाम, रंजीता पेंदाम, तलाठी जांगी, पी. टी. तुलावी, चांदाळाच्या ग्रा. पं. सदस्य उषा गावडे, रूपा कुमरे, किरंगे, कुमरे, शांताराम किरंगे, मरेगावचे उपसरपंच रवींद्र मसराम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डंबाजी पेंदाम, संचालन मोरेश्वर गेडाम तर आभार उमाकांत गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी विशाल मडावी, कैलास गेडाम, अरविंद गेडाम, वनिता गेडाम, आशा मडावी, ललीता मडावी, पार्वता गेडाम, वच्छला तुमराम, पौर्णिमा गेडाम, संदीप मडावी, सचिन गेडाम व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
धार्मिक कार्यक्रमासह मनोरंजन
गोंडीधर्म संमेलनात संदीप वरखडे व रामचंद्र काटेंगे यांच्या हस्ते गोंडीध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर गावातून रॅली काढून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. या कार्यक्रमाला रानखेडासह मुरमाडी, मौशिचक, कातखेडा, अमिर्झा, बेलगाव, मरेगाव, मासरगाटा, निमगाव, निमनवाडा, चांभार्डा येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.