जिल्ह्यात येणाऱ्या अवैध दारूवर अंकुश लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:25 AM2021-06-17T04:25:10+5:302021-06-17T04:25:10+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीलासुद्धा धक्का लागण्याची शक्यता आहे. दारू सुरू असलेल्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी ...
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीलासुद्धा धक्का लागण्याची शक्यता आहे. दारू सुरू असलेल्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी वाढणार. गडचिरोलीतील व्यसनाधीनतेचेही प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू येणार नाही, यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी देसाईगंज तालुक्यातील २९ गावांनी केली आहे.
तालुक्यातील कोकडी, फरी, उसेगाव, किन्हाळा, शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी तुकूम, रावणवाडी, बोडधा, कोरेगाव, चिखली, चिखली तुकूम, डोंगरगाव हलबी, शिवराजपूर चक, गांधीनगर, सावंगी, आमगाव, एकलपूर, चोप, विठ्ठलगाव, पिंपळगाव, पोटेगाव, विहीरगाव, अरततोंडी, कोंढाळा, कुरूड, विसोरा, तुळशी आदी २९ गावे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्यासमर्थनात उभी आहेत. यासंदर्भात गावांनी ठराव घेतला असून, चंद्रपूरची दारूबंदी कायम ठेवण्याची मागणी सरकारकडे केली आहे.