संचारबंदी मत्स्य पालन संस्थांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:27 AM2021-05-28T04:27:21+5:302021-05-28T04:27:21+5:30

वैरागड मच्छिपालन सहकारी संस्थांतर्गत महादेव तलाव, आरकबोडी, माराईबोडी, अगड, गादबोडी या तलावांत मत्स्यबीज टाकून व त्याचे पालन करून योग्य ...

Curfew at the root of fisheries institutions | संचारबंदी मत्स्य पालन संस्थांच्या मुळावर

संचारबंदी मत्स्य पालन संस्थांच्या मुळावर

Next

वैरागड मच्छिपालन सहकारी संस्थांतर्गत महादेव तलाव, आरकबोडी, माराईबोडी, अगड, गादबोडी या तलावांत मत्स्यबीज टाकून व त्याचे पालन करून योग्य वाढ झाल्यानंतर संस्थेचे सदस्य सामूहिकरीत्या मासे पकडून त्याची विक्री केली जाते. त्याच नफ्यातून संस्थांचा आर्थिक व्यवहार चालतो साधारण संस्था तीळसंक्रांतीच्या सणानंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने मासे विक्रीसाठी पकडतात ते ३१ जूनपर्यंत मासेमारी चालते. मात्र, या वर्षात १५ एप्रिलपासून मासेमारी बंद असल्याने मत्स्य पालन संस्था आर्थिक डबघाईस आल्या आहेत. वैरागड मच्छी पालन सहकारी संस्थेत १७२ सदस्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मागील काही वर्षांत अपुरा पाऊस पडल्याने मत्स्य पालन संस्था सतत आर्थिक तोट्यात आहेत. यंदा तलावात जलसाठा भरपूर असला तरी मासेमारी न झाल्याने मत्स्य पालन संस्था आर्थिक संकटात आहेत.

Web Title: Curfew at the root of fisheries institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.