फलकाला लटकविले जातात ग्राहकांचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:46 AM2019-03-06T00:46:44+5:302019-03-06T00:51:10+5:30

प्रत्येक ग्राहकाच्या घरी वेळेवर वीज बिल नेऊन देणे हे वीज बिल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. मात्र एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये एखाद्या दुकानात, गावातील फलकाला संपूर्ण गावाचे वीज बिल लटकविले जातात.

Customers are charged with electricity bills | फलकाला लटकविले जातात ग्राहकांचे वीज बिल

फलकाला लटकविले जातात ग्राहकांचे वीज बिल

googlenewsNext
ठळक मुद्देनेंडेर येथील प्रकार : महावितरणचे दुर्लक्ष, बिल वितरकावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : प्रत्येक ग्राहकाच्या घरी वेळेवर वीज बिल नेऊन देणे हे वीज बिल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. मात्र एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये एखाद्या दुकानात, गावातील फलकाला संपूर्ण गावाचे वीज बिल लटकविले जातात. असाच प्रकार एटापल्ली-गट्टा मार्गावरील नेंडेर गावात उघडकीस आला आहे. संबंधित वीज बिल वितरण करणाºयावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वीज बिल वसुलीबाबत महावितरणने अतिशय कडक धोरण अवलंबिले आहे. एक महिन्याचे जरी वीज बिल थकले तरी संबंधित वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. महावितरणने वीज बिल भरण्यात सुलभता आणण्यासाठी एसएमएस सुविधा, अ‍ॅपचा वापर सुरू केला आहे. मात्र या सर्व सुविधांसाठी मोबाईल कव्हरेज व इंटरनेटची सुविधा असणे आवश्यक आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मात्र मोबाईल व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. अशा गावांमध्ये महावितरणची आधुनिक साधने बेकामी आहेत. या ग्राहकांना अजुनही जेव्हा वीज बिल प्राप्त होते, तेव्हाच आपले बिल किती आले, हे कळते व हेच बिल धरून ते संबंधित बँकेत जातात.
दुर्गम भागातील नागरिकांना वीज बिल मिळणे अतिशय आवश्यक आहे. वीज बिल वितरणाचे काम महावितरण एखाद्या खासगी स्थानिक व्यक्तीला देते. वीज बिल वितरणासाठी प्रती बिल एक रुपया संबंधित व्यक्तीला दिला जातो. त्यामुळे वीज बिल घरोघरी नेऊन देणे ही संबंधित व्यक्तीचे कर्तव्य आहे. मात्र दुर्गम भागातील आदिवासी नागरिक सहजासहजी कुणाची तक्रार करीत नाही.
याचा गैरफायदा वीज बिल वितरण करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. नेंडेर गावातील नागरिकांचे वीज बिल रस्त्याच्या बाजुला असलेल्या खांबाला लटकवून संबंधित व्यक्ती पसार झाला. गावातील नागरिक स्वत:चे बिल शोधत होते.

बिल हरविल्यास जबाबदार कोण?
वीज बिल प्राप्त झाल्याशिवाय दुर्गम भागातील नागरिक वीज भरू शकत नाही. अशातच वादळ, वारा, पाऊस यामुळे वीज बिल उडून गेल्यास किंवा एखाद्या व्यक्तीने वीज बिल जाणून बुजून फेकून दिल्यास ग्राहकाला वीज बिल उपलब्ध होणार नाही. अशावेळी वीज बिल भरयाचा कसा, असा प्रश्न निर्माण होतो. वीज बिल भरले नाही म्हणून महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा खंडीत करतात. ग्राहकाची चुकी नसतानाही त्याचा वीज पुरवठा खंडीत होतो. कामचुकारपणा करणाºया वीज बिल वितरकावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Customers are charged with electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज