आष्टी येथे राेकड संपल्याने ग्राहक एटीएममधून परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:26 AM2020-12-27T04:26:56+5:302020-12-27T04:26:56+5:30
आष्टी येथे स्टेट बॅंक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे एटीएम आहे. स्टेट बॅंकेचे एटीएम बॅंकेच्या वेळेतच सुरू असते. बॅंकांना ...
आष्टी येथे स्टेट बॅंक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे एटीएम आहे. स्टेट बॅंकेचे एटीएम बॅंकेच्या वेळेतच सुरू असते. बॅंकांना असलेल्या सुटीच्या दिवशी हे एटीएम बंद असते. आष्टी शहर व परिसरातील बऱ्याच ग्राहकांचे व्यवहार स्टेट बॅंकमधूनच चालत आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये नेहमी गर्दी असते. मात्र आष्टी येथे एटीएमची सेवा नियमित व याेग्यरित्या मिळत नाही. बॅंकांना सलग तीन दिवस सुट्या आल्याने ग्राहकांचा एटीएमवर आर्थिक व्यवहार करण्यासाठी भर राहणार आहे. शुक्रवारी रात्री उशिरापासून चामाेर्शी तालुक्यातील अनेक एटीएम कॅशलेस झाले.
गडचिराेली शहरात राष्ट्रीयकृत व इतर सर्व बॅंकांचे मिळून जवळपास १५ एटीएम आहेत. मात्र सुट्या आल्याने येथील बरेच एटीएम शनिवार दुपारनंतर कॅशलेस झाल्याचे दिसून आले. पुरेशी राेकड ठेवण्याची मागणी आहे.