राेग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:27 AM2021-06-04T04:27:57+5:302021-06-04T04:27:57+5:30

कृषी विज्ञान केंद्र, आत्मा आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ जून राेजी जागतिक दूध दिवस साजरा करण्यात आला. ...

Dairy products should be included in the diet to increase immunity | राेग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा

राेग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा

Next

कृषी विज्ञान केंद्र, आत्मा आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ जून राेजी जागतिक दूध दिवस साजरा करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्रात ऑफलाईन व ऑनलाईन पार पडलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. व्ही. ए. गाडगे, सहायक उपायुक्त डाॅ. संजय धाेटे, माविमच्या वरिष्ठ समन्वय अधिकारी कांता मिश्रा, कृषी महाविद्यालयाचे डी. टी. उंद्रटवाड, पशुधन विकास अधिकारी डाॅ. सचिन श्रीरामे, पशुधन विकास अधिकारी डाॅ. एन. एस. खलाटे, डाॅ. नीलिमा पाटील उपस्थित हाेते. डाॅ. व्ही. ए. गाडगे यांनी जिल्ह्यातील हवामान, पीक पद्धती, उपलब्ध संसाधने याचा विचार करून जातीवंत व देशी-विदेशी गाईंचे संगाेपन करून दुग्ध उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले. डाॅ. संजय धाेटे यांनी जाेड व्यवसायातून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला चालना द्यावी, असे सांगितले. कांता मिश्रा यांनी दूध आणि दूध प्रक्रिया व्यवसाय यासह विविध बाबींवर मार्गदर्शन केले. प्रा. डी. टी. उंद्रटवाड यांनी चारा व्यवस्थापन, दुधाळ जनावरांच्या आराेग्याविषयी माहिती दिली. डाॅ. एन. एस. खलाटे यांनी जनावरांचे लसीकरण, घ्यावयाची काळजी याविषयी सांगितले. डाॅ. श्रीरामे यांनी चारा व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. डाॅ. विक्रम कदम यांनी मुरघास, अझाेला, डेअरी व्यवसाय, गाेठा, चारा व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन विषय विशेषज्ज्ञ ज्ञानेश्वर ताथाेड तर आभार विषय विशेषज्ज्ञ नरेश बुद्धेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी माेहित गणवीर, सुधीर सलामे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बाॅक्स ....

चाऱ्याचे प्रात्यक्षिक व साहित्य वाटप

कृषी विज्ञान केंद्रात पार पडलेल्या जागतिक दूध दिनानिमित्त कार्यक्रमात उपस्थित पशुपालकांना सकस चाऱ्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. काेरड्या तणशीवर विशिष्ट प्रक्रिया करून जनावरांना ते खाण्यायाेग्य कसे करता येईल, याविषयी माहिती देण्यात आली. तसेच दुग्ध वाढीसाठी जनावरांना खाद्य पदार्थाचे वितरण पशुपालकांना करण्यात आले. अनेक पशुपालकांना याचा लाभ देण्यात आला.

===Photopath===

030621\03gad_3_03062021_30.jpg

===Caption===

साहित्य वितरण प्रसंगी उपस्थित डाॅ. संदीप कऱ्हाळे, डाॅ. व्ही. ए. गाडगे, डाॅ. संजय धाेटे व अन्य.

Web Title: Dairy products should be included in the diet to increase immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.