शेतकऱ्यांना डाळ निर्मितीचे प्रशिक्षण

By Admin | Published: November 20, 2014 10:53 PM2014-11-20T22:53:05+5:302014-11-20T22:53:05+5:30

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत २० शेतकऱ्यांना मिनी डाळ मिलद्वारे डाळ निर्मितीचे प्रशिक्षण द

Dals production training for farmers | शेतकऱ्यांना डाळ निर्मितीचे प्रशिक्षण

शेतकऱ्यांना डाळ निर्मितीचे प्रशिक्षण

googlenewsNext

गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत २० शेतकऱ्यांना मिनी डाळ मिलद्वारे डाळ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप लांबे, कृषी पणन तज्ज्ञ विजय अरगडे, विषय विशेषतज्ज्ञ डॉ. एस. एल. बोरकर, प्रा. योगिता सानप, हेमंत उंदीरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी अनंत पोटे यांनी कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी कडधान्याची डाळ तयार केल्याची बाजारात या दाळेला चांगली मागणी व भाव मिळतो. डाळ मिलींगचा खर्च अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांनी डाळ निर्मितीकडे वळावे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप लांबे यांनी राईसमिल सोबत डाळ मिल उभारावी, असे मत व्यक्त केले. तूर, मूंग, उळीद इत्यादी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काही शेतकरी घरी डाळीचा वापर करण्यासाठी डाळ दळतात. शेतकऱ्यांनी स्वत:चा ब्रॅन्ड तयार करून तो बाजारात विकल्यास आणखी जास्त किंमत मिळण्यास मदत होईल, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल.
प्रशिक्षण समन्वयक प्रा. संदीप कऱ्हाडे यांनी डाळ निर्मितीचे तंत्रज्ञान एका लाखात उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्हाभरातील २० शेतकरी उपस्थित होते. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Dals production training for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.