मेडिगड्डामुळे शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:00 AM2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:00:40+5:30
मेडिगड्डा धरण पाण्याने पूर्णत: भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकाचवेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने गोदावरी नदीची दरड कोसळत आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले असून नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. या धरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परंतु यावर उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : सिरोंचा तालुका व तेलंगणा राज्यातील लोकांचा संबंध आहे. दरम्यान तेलंगणा सरकारने आपल्या हद्दीत गोदावरी नदीवर मेडिगड्डा सिंचन प्रकल्प बांधला. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा परिसरातील शेतकऱ्यांची जमीन खरडून जात आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.