केंद्र सरकारच्या जनविराेधी धाेरणांमुळे देशाची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:44 AM2021-09-10T04:44:30+5:302021-09-10T04:44:30+5:30
काँग्रेसचे काेरची तालुकाध्यक्ष दिवंगत श्यामलाल मडावी यांना पक्षातर्फे ८ सप्टेंबर राेजी श्रद्धांजली वाहण्यात आली. या निमित्ताने पारबताबाई विद्यालयात श्रद्धांजली ...
काँग्रेसचे काेरची तालुकाध्यक्ष दिवंगत श्यामलाल मडावी यांना पक्षातर्फे ८ सप्टेंबर राेजी श्रद्धांजली वाहण्यात आली. या निमित्ताने पारबताबाई विद्यालयात श्रद्धांजली सभा व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार हरिराम वरखडे, प्रदेश काँग्रेस सचिव पंकज गुंडेवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे, अनुसूचित जाती महिला सेलच्या जिल्हाध्यक्ष अपर्णा खेवले, रामदास टिपले, देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष परसराम टिकले, कुरखेडा तालुका अध्यक्ष जयंत हरडे, जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा लोहंबरे, एल. डब्ल्यू. रामटेके, पंचायत समितीचे सभापती श्रावण मातलाम, कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष मनोज अग्रवाल, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेमिला काटेंगे, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सदरुद्दीन भामानी, महासचिव हकीमुद्दीन शेख, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल अंबादे, हेमंताताई शेंडे, कचरीताई काटेंगे, हर्षलता भैसारे, जुल्फिकार खेतानी, रुख्मन घाटघुमर, धनिराम हिडामी, परमेश्वर लोहंबरे, रामदास हरामी, धनराज मडावी, रामदास साखरे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज अग्रवाल, संचालन जीवन भैसारे, तर आभार वसीम शेख यांनी मानले.
बाॅक्स
श्यामलाल मडावी यांचा सिंहाचा वाटा
कोरची तालुक्यात काँग्रेस पक्षाने नेहमी आपली उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यात अनेकांचा सहभाग राहिला; परंतु तालुक्याच्या विकासात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्व. श्यामलाल मडावी यांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. माजी आमदार आनंदराव गेडाम यांनीही मडावी यांच्या कार्याचा गाैरवपूर्ण उल्लेख केला.