गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात ३४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 07:36 PM2020-09-07T19:36:15+5:302020-09-07T19:37:34+5:30

सिरोंचा तालुक्याच्या टेकडा परिसरातील टेकडाताला, जाफ्राबाद, मोकेला, नेमडा आदी ग्रा.पं. अंतर्गतची गावे प्राणहिता नदीलगत वसली आहे. चार दिवसांपूर्वी आलेल्या पुराचा या गावातील शेतीला मोठा फटका बसला. परिसरातील जवळपास ३४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

Damage to crops on 348 hectares in Sironcha taluka of Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात ३४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात ३४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांकडून पाहणीटेकडाताला, जाफ्राबाद परिसराला पुराचा फटका


लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याच्या टेकडा परिसरातील टेकडाताला, जाफ्राबाद, मोकेला, नेमडा आदी ग्रा.पं. अंतर्गतची गावे प्राणहिता नदीलगत वसली आहे. चार दिवसांपूर्वी आलेल्या पुराचा या गावातील शेतीला मोठा फटका बसला. परिसरातील जवळपास ३४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नुकसानग्रस्स्त पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गोसेखुर्द पाण्याच्या विसर्गामुळे प्राणहिता नदी पात्रात दाब वाढला. परिणामी पूर परिस्थिती निर्माण होऊन टेकडाताला परिसरातील २५० हेक्टरवरील कापूस व ९८ हेक्टरवरील धान पिकाचे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

पाहणी दरम्यान आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, जि.प. सदस्य अजय नैताम, पं.स. सभापती भास्कर तलांडे, जाफ्राबादचे सरपंच बापू सडमेक, उपसरपंच तिरूपती दुर्गम, सुधाकर पेद्दी, रवी सल्लम, बीडीओ पाटले, तालुका कृषी अधिकारी शेंडे, पं.स. कृषी अधिकारी खोपणार, सिरोंचाचे उपविभागीय अभियंता योगराज मासे, जाफ्राबादचे तलाठी मुरली इचकापे, कृषी सेवक आर. एल. मेश्राम, साई मंदा, प्रविण निलम, रवी बारसागडे आदी उपस्थित होते. पिकांचे नुकसान झाल्यामुळे जाफ्राबाद परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कृषी कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Damage to crops on 348 hectares in Sironcha taluka of Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर