आमदारांकडून नुकसानाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:42 PM2018-05-17T23:42:39+5:302018-05-17T23:42:39+5:30
घोट परिसरात बुधवारी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शीचे तहसिलदार अरुण येरचे यांच्यासोबत नुकसानग्रस्त गावात जाऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : घोट परिसरात बुधवारी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शीचे तहसिलदार अरुण येरचे यांच्यासोबत नुकसानग्रस्त गावात जाऊन पाहणी केली.
यावेळी आ. डॉ. होळी यांनी निकतवाडा, गांधीनगर, वरूर, चापलवाडा या भागातील नुकसानीची पाहणी केली. उघड्यावर आलेल्या नागरिकांना प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून मदत करावी, असे निर्देश आ. होळी यांनी महसुल विभागाला दिले. यावेळी तहसिलदार येरचे यांनी तत्काळ नुकसानीचे पचंनामे सबंधीत तलाठ्याने तात्काळ सादर करावे, असे निर्देश तलाठ्यांना दिले. तसेच विद्युत विभागाने खंडीत विद्युत पुरवठा सुरु करावा, नागरिकांची गैरसोय टाळावी, अतिरिक्त मजूर लावून विद्युत पुरवठा सुरु करावा, असे निर्देश सबंधीत विभागास दिले.
याप्रसंगी जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के , भाजपच्या बंगाली आघाडी जिल्हाअध्यक्ष सुरेश शाहा, घोटचे उपसरपंच साईनाथ नेवारे, वरूरचे सरपंच विलास चौधरी, रमेश अधिकारी, घोटचे मडंळ अधिकारी एस. जी. सरपे, घोटचे तलाठी एन. एस. अतकारे, चापलवाड्याचे तलाठी आलाम आदी उपस्थित होते. यावेळी नुकसानग्रस्तांनी समस्या मांडल्या.