रानडुकरांमुळे मका पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:55 AM2021-02-05T08:55:33+5:302021-02-05T08:55:33+5:30
भामरागड : कमी खर्चात चांगले उत्पादन होत असल्याने मका पिकाखालील क्षेत्र भामरागड तालुक्यात वाढत चालले आहे. एवढेच नाही तर ...
भामरागड : कमी खर्चात चांगले उत्पादन होत असल्याने मका पिकाखालील क्षेत्र भामरागड तालुक्यात वाढत चालले आहे. एवढेच नाही तर अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या लाहेरी भागातही मक्याची लागवड केली जात आहे. मात्र रानडुकरांकडून मका पीक उद्ध्वस्त केले जात आहे.
भामरागड तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने रबी हंगामात प्रामुख्याने उडीद, मूग, चणा, कुरता, ज्वारी आदी पारंपरिक पिकांचे उत्पादन घेतात. मात्र मका हे कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक असल्याने भामरागड तालुक्यातील शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. लाहेरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. या परिसरातील शेती जंगलाला लागून आहे. रानडुकरांकडून मका पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले जात आहे.
कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून या पिकाची ओळख बनत चालली आहे. त्यामुळेच शेतकरी या पिकाकडे वळत चालला आहे. डुकरांकडून पिकाचे नुकसान केल्यास त्याची नुकसान भरपाई देण्याचे वनविभागाकडून सांगितले जात असले तरी वनविभाग अत्यंत कमी प्रमाणात माेबदला देत आहे.