अयोध्येतील राम मंदिराला दंडकारण्यातील दरवाजे, ४५ नक्षीदार दरवाजे-खिडक्या बनविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 06:57 AM2023-01-26T06:57:06+5:302023-01-26T06:57:20+5:30

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने सुरू आहे.

Dandakarana doors 45 carved doors and windows will be made for the Ram temple in Ayodhya | अयोध्येतील राम मंदिराला दंडकारण्यातील दरवाजे, ४५ नक्षीदार दरवाजे-खिडक्या बनविणार

अयोध्येतील राम मंदिराला दंडकारण्यातील दरवाजे, ४५ नक्षीदार दरवाजे-खिडक्या बनविणार

googlenewsNext

गडचिरोली :

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. या मंदिराच्या दरवाजांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली डेपोतील उच्च प्रतिच्या सागवान लाकडांचा वापर केला जाणार आहे. यासाठी लार्सन ॲन्ड टुब्रो कंपनीचा चमू आलापल्लीत दाखल झाला आहे.

आलापल्लीच्या जंगलातील उच्च प्रतिचे सागवान देशात प्रसिद्ध आहे. राम मंदिर ट्रस्टने आणि या मंदिराची उभारणी करत असलेल्या लार्सन ॲन्ड टुब्रो कंपनीच्या चमूने देशाच्या इतरही काही भागातील सागवानाची चाचपणी केली. 

पण राम मंदिराच्या उभारणीत लागणाऱ्या दरवाजे आणि खिडक्यांसाठी अपेक्षित दर्जाचे सागवान त्यांना मिळाले नाही. आलापल्ली येथील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या डेपोतील (एफडीसीएम) सागवान मात्र त्यांच्या पसंतीस उतरले आहे. या चमूने लाकडांचा दर्जा तपासून उत्कृष्ट असणाऱ्या लाकडांची निवड करणे सुरू केले आहे. 

नक्षीकामासाठी होणार वापर
आलापल्लीतील सागवानाचा वापर ४५ दरवाजे-खिडक्यांसाठी व राम मंदिराच्या पहिल्या माळ्यावरील धार्मिक चिन्हे कोरण्यास केला जाणार आहे. त्यासाठी सागवान कापून अयोध्येला नेले जाणार आहे. आलापल्ली येथील वन विभागाचा सागवान डेपो आणि आरामशीन ब्रिटिशकालीन आहे. 

माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनीही आलापल्लीच्या आरामशीनला भेट देऊन लाकडांची पाहणी करत चमूला मार्गदर्शन केले. देशवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या राम मंदिरासाठी आपल्या भागातील लाकडांची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Dandakarana doors 45 carved doors and windows will be made for the Ram temple in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.