अनुदानित शाळांची भौतिक सुविधांना दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:27 PM2018-11-26T22:27:53+5:302018-11-26T22:28:29+5:30

नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांच्या भोळेपणाचा फायदा घेत काही शाळा सरकारी अनुदान घेऊनही सुविधा मात्र कोणत्यात देत नाही. या बाबतीत येमली येथील स्वामी विवेकानंद शाळेत आलेला अनुभव धक्कादायक आणि शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाचे जीवंत उदाहरण ठरला आहे.

Dandi in the physical facilities of aided schools | अनुदानित शाळांची भौतिक सुविधांना दांडी

अनुदानित शाळांची भौतिक सुविधांना दांडी

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात : शाळांच्या दुरवस्थेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

रवी रामगुंडेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांच्या भोळेपणाचा फायदा घेत काही शाळा सरकारी अनुदान घेऊनही सुविधा मात्र कोणत्यात देत नाही. या बाबतीत येमली येथील स्वामी विवेकानंद शाळेत आलेला अनुभव धक्कादायक आणि शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाचे जीवंत उदाहरण ठरला आहे. या शाळेप्रमाणेच जिल्हाभरात अशा किती शाळांची स्थिती कागदावर चांगली आणि प्रत्यक्षात वेगळीच आहे, याचा नव्याने आढावा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
लोकमतने शनिवार दि.२४ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन केलेल्या पाहणीत येमलीतील स्वामी विवेकानंद शाळेची अवस्था समोर आली. सदर शाळेत भौतिक सुविधांचा अभाव आहे. शाळेच्या आवारात शौचालय व मूत्रीघरसुद्धा नाही. पिण्याच्या शुद्धा पाण्याची व्यवस्था नाही. शाळा खोलीतच कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले. खर्रा खाऊन घाण केल्याचेही या शाळेच्या वर्गखोलीत पहायला मिळाले. यावरून शाळेची शिस्त काय आहे हे स्पष्ट होते.
विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या नोंदीत या शाळेत मुलांचे शौचालय, पिण्याच्या पाण्यासाठी विहीर, खेळांचे मैदान, विद्युत पुरवठा अशा सर्वच सोयीसुविधा असल्याचे दाखविले आहे.
सदर शाळेत इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत ५९ विद्यार्थीसंख्या आहे. तर अकरावी व बारावी या दोन वर्गाची मिळून ४७ विद्यार्थीसंख्या आहे. शनिवारी ११.४५ वाजता शाळेची एक वर्गखोली उघडी होती. तीन खोल्या कुलूपबंद होत्या. शनिवारी सकाळी ७.३० ते १०.४० पर्यंत शाळा होती. त्यामुळे शिक्षक घरी गेल्याचे तेथे काही वेळानंतर आलेल्या शिपायाने सांगितले. माध्यमिक शाळा आटोपल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी येतात. पण एकही विद्यार्थी तिथे उपस्थित नव्हता. हे कनिष्ठ महाविद्यालय कायम विनाअनुदानित तत्वावर असल्याने येथे उच्च माध्यमिक शिक्षकाचे एकही पद भरण्यात आले नाही. केवळ तासिका तत्वावरील एक शिक्षक देण्यात आला असून सदर शिक्षकही कधी येतो तर कधी शाळेत येत नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी लोकमतला दिली.
काही ग्रामस्थांनी शिक्षक प्रभूदास झाडे यांना बोलवून आणल्यानंतर त्यांनी आज एकही विद्यार्थी शाळेत आला नसल्याचे सांगितले. सदर शाळेला एक मुख्याध्यापक, चार माध्यमिक शिक्षक, एक लिपीक, एक प्रयोगशाळा परिचर, तीन शिपाई अशा एकूण १० कर्मचाºयांची पदे भरण्यात आली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकच जर गायब राहात असेल तर शाळेचा कारभार केवळ शासनाचा पगार लाटण्यासाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अशा शाळांचा कारभार पाहता, तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येते. मात्र या गंभीर प्रकाराकडे माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. सदर शाळेत संबंधित संस्थेने विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण सुविधा द्याव्या, अन्यथा शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शिक्षण विभागाच्या निकषानुसार अनुदानित शाळांमधील भौतिक सुविधांसाठी विविध प्रकारचे १० निकष ठरवून दिले आहेत. त्या निकषांची पूर्तता न करणाºया शाळांवर कारवाई होऊ शकते. परंतू अनेक दिवसांपासून सुविधा नसताना प्रत्यक्ष कोणतीच कारवाई होत नाही.
गडचिरोलीवरून चालतो कारभार
विवेकानंद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत माध्यमिक शिक्षक प्रभूदास झाडे हे शाळेच्या गावी येमली येथे निवासी राहून आपले कर्तव्य बजावतात. मात्र इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एटापल्ली तालुका मुख्यालयावरून येमली येथे अप-डाऊन करतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.
विशेष म्हणजे, सदर शाळेच्या संस्था अध्यक्ष शशिकला संभाजी बागेसर यांचा मुलगा मिलिंद बागेसर हे या शाळेत प्रयोगशाळा परिचर पदावर कार्यरत आहे. ते गडचिरोली येथे राहतात. गडचिरोली येथे राहूनच ते सदर शाळेचा कारभार पाहतात, अशी माहिती येमलीवासीयांनी सदर प्रतिनिधीला दिली.

Web Title: Dandi in the physical facilities of aided schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.