वन्यप्राणी प्रगणकांचा जीव धोक्यात

By admin | Published: May 24, 2016 01:35 AM2016-05-24T01:35:14+5:302016-05-24T01:35:14+5:30

वन्यप्राणी संरक्षण व गणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एफडीसीएमने मचान तयार करून दिले नाही.

The danger of the wildlife of the organisms | वन्यप्राणी प्रगणकांचा जीव धोक्यात

वन्यप्राणी प्रगणकांचा जीव धोक्यात

Next

जोगीसाखरा : वन्यप्राणी संरक्षण व गणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एफडीसीएमने मचान तयार करून दिले नाही. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांना तलावाच्या पाळीवर रात्री थांबून गणना करावी लागत आहे. हिंस्त्र प्राण्यांपासून त्यांच्या जीवाला धोका असला तरी एफडीसीएमचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
होळी व बुद्ध पौर्णिमा या दोन रात्री सर्वाधिक चंद्रप्रकाश राहत असल्याने वन्यप्राण्यांची गणना करण्यासाठी या रात्री अतिशय अनुकूल माणल्या जातात. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास तलावावर पाणी पिण्यासाठी येत असल्याने वन विभागाचे दहा कर्मचारी रात्रीच्या सुमारास पाहारा देऊन त्यांचे वन्यजीव तस्करांपासून संरक्षण करतात. या कामासाठी १५ फूट उंच असलेली मचान तयार करणे आवश्यक आहे. प्रत्येक मचानीवर दोन मजूर ठेवले जातात. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री कराडी येथील जंगलातील बांधावर लोकमत प्रतिनिधीने रात्री १२ वाजता भेट दिली असता, वनपाल एन. आर. जांभुळकर, वनरक्षक आर. एम. सोयाम, जी. आय. उईके, वाघमारे, वनमजूर के. के. पाल, डब्ल्यू. आर. हाळगे हे प्राणी गणना करीत होते. मात्र संरक्षणाच्या दृष्टीने त्याठिकाणी मचान तयार करण्यात आली नव्हती.
वन्य संरक्षणासाठी वन विभाग व एफडीसीएमला कोट्यवधी रूपयांचा निधी शासनाकडून प्राप्त होतो. मात्र सदर निधी कागदावरच खर्च केला जात असल्याचे यावरून सिद्ध होत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: The danger of the wildlife of the organisms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.