नवेगाव - फोकुर्डी मार्गावरील पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:33 AM2021-04-03T04:33:00+5:302021-04-03T04:33:00+5:30
नवेगाव - फोकुर्डी मार्गावर मायनर आहे त्याला ओलांडून जाण्यासाठी ५० वर्षांपूर्वी अरुंद पूल बांधकाम करण्यात आले आहे. या पुलावरून ...
नवेगाव - फोकुर्डी मार्गावर मायनर आहे त्याला ओलांडून जाण्यासाठी ५० वर्षांपूर्वी अरुंद पूल बांधकाम करण्यात आले आहे. या पुलावरून दररोज दुचाकी व अन्य वाहनांची वर्दळ असते. पूल सध्या जीर्णावस्थेत असतानाही नागरिक या पुलावरून ये - जा करीत असतात. अनेकदा या पुलावर किरकोळ अपघात सुध्दा होत असतात .पुलाच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस आला तरी पुलावर २ फूट पाणी साचत असते. या पाण्यातून नागरिक, विद्यार्थी वाट काढत ये - जा करतात. जीव धोक्यात घालून ये - जा करावे लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देऊन या ठिकाणी उंच व रुंद पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे .