निर्माल्य विसर्जन जलप्रदूषणासाठी धोक्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:44 AM2021-09-10T04:44:15+5:302021-09-10T04:44:15+5:30
निर्माल्य हे नाशवंत असल्याने जलसाठ्यातील पाण्यात ते सडते, विघटन होते. ह्या सडण्याच्या प्रक्रियेसाठी पाण्यातील ऑक्सिजन, प्राणवायू वापरला जातो. त्यामुळे ...
निर्माल्य हे नाशवंत असल्याने जलसाठ्यातील पाण्यात ते सडते, विघटन होते. ह्या सडण्याच्या प्रक्रियेसाठी पाण्यातील ऑक्सिजन, प्राणवायू वापरला जातो. त्यामुळे जलसाठ्यातील पाणी प्रदूषित होते. नदी-नाले व तलावातील मासे, बेडूक, कासव, खेकडे व जलवनस्पती तसेच अन्य जलचरांचे जीवन धोक्यात येते. प्रदूषित पाणी पिल्यास गुरेढोरे व अन्य जनावरांना विषबाधाही होते. नजीकच्या विहिरी देखील प्रदूषित होतात. आनंदाची उधळण करणारा गणेशोत्सव साजरा करताना निर्माल्य जलसाठ्यात विसर्जित न करता बगिच्यात किंवा जमिनीत पुरल्यास माती सुपिक बनेल व बाग अधिक फुलेल. गणेशाेत्सवात पीओपीची मूर्ती न वापरता पर्यावरणपूरक मातीची गणेश मूर्तीं स्थापन करावी. शेवटी पिंप किंवा टबमध्ये घरगुती मूर्ती विसर्जित करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन अंनिसचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे यांनी केले आहे.