गुड्डीगुडम परिसर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:14 AM2019-07-29T00:14:32+5:302019-07-29T00:15:06+5:30

अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात मागील अनेक दिवसांपासून वीज समस्या आहे. परंतु मागील चार दिवसांपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

In the darkness of the Gudigudam area | गुड्डीगुडम परिसर अंधारात

गुड्डीगुडम परिसर अंधारात

googlenewsNext
ठळक मुद्देचार दिवस उलटले : महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात मागील अनेक दिवसांपासून वीज समस्या आहे. परंतु मागील चार दिवसांपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात नेहमीच वीज पुरवठा खंडित होत असतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. मागील चार दिवसांपासून परिसरातील तितरम, निमलगुडम, गोलाकर्जी, रायगट्टा येथील वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. गुड्डीगुडम भागाला जिमलगट्टा विद्युत उपकेंदातून वीज पुरवठा केला जातो. सदर अंतर लांब पडत असल्याने अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या परिसरात नियमित वीज पुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु अनियमित वीज पुरवठा करून दर महिन्याला देयके पाठविण्याचे काम महावितरण कंपनीतर्फे केले जाते, असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, कंपनीचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत, असे संतोष गणपूरवार, रमेश बावनकर, श्रीनिवास पट्टावार, नारायण कोतकोंडावार यांनी म्हटले आहे.

स्थायी लाईनमनची नियुक्ती करण्याची मागणी
गुड्डीगुडम परिसरात महिन्यातून जवळपास आठ ते दहा दिवसच विद्युत पुरवठा सुरळीत केला जातो. उर्वरित दिवशी केवळ विजेचा लपंडाव असतो. विशेष म्हणजे, या दुर्गम भागात लाईनमन मुख्यालयी राहत नाही. एका लाईनमनकडे अनेक गावांचा प्रभार असतो. गुड्डीगुडम परिसरात स्थायी लाईनमन नसल्याने या भागातील वीज पुरठ्यात बिघाड आल्यास वेळीच दुरूस्ती केली जात नाही. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसºया दिवशीपर्यत तो पूर्ववत होत नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना डासांच्या प्रकोपाला बळी पडावे लागत आहे. यातून विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे स्थायी लाईनमन नियुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: In the darkness of the Gudigudam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज