वर्षभरानंतर साेमनुरात ‘लालपरी’चे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:10 AM2021-03-04T05:10:01+5:302021-03-04T05:10:01+5:30
सोमनूर येथे तीन नद्यांच्या संगम असून गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम पर्यटन क्षेत्र आहे. मात्र या गावापर्यंत जाणारी बसफेरी मागील ...
सोमनूर येथे तीन नद्यांच्या संगम असून गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम पर्यटन क्षेत्र आहे. मात्र या गावापर्यंत जाणारी बसफेरी मागील वर्षी काेराेनामुळे बंद करण्यात आली. बसफेरी सुरू करण्यासाठी सोमनूरवासीयांनी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली. परंतु बस सेवा सुरू करण्यात आली नाही. २६ फेब्रुवारी रोजी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार, जिल्हा प्रमुख राजगोपाल सुल्वावार, उपजिल्हा प्रमुख रियाज शेख, विलास कोडापे यांनी सिरोंचा तालुक्यात दाैरा करून तालुक्यातील लोकांशी संवाद साधला. सोमनूर येथेसुद्धा त्यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या हाेत्या. तेव्हा नागरिकांनी बसवेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली हाेती. पदाधिकाऱ्यांनी याविषयी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोमनूरसाठी बसफेरी सुरू करण्याची मागणी करुन पाठपुरावा केला. अखेर या मागणीला यश आले. बुधवारी साेमनूरमार्गे बसफेरी सुरू झाली. बसफेरी सुरू झाल्यामुळे गावातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. सोमनूर येथे एसटी महामंडळाची बस पाेहाेचताच शिवसेना तालुका प्रमुख अमित तिपट्टी, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख करुणा जोशी, उपतालुका प्रमुख चंदू बत्तुला, तालुका संघटक दुर्गेश तोकला यांनी बसचे स्वागत केले. यावेळी वेणू कोत्तवाडला, सुरेंद्र सेनिगारपू, शंकर जिमडे, विनोद फुलसे, शिवय्या तलांडी, सुकय्या सिडाम, सिनू कुरसाम, मौनिक दुम्पा, ममता गावडे, पूजा कावरे, विजया फुलसे, यमना गावडे, मनीषा फुलसे, समक्का पिरला, गीता गावडे, साई सगुलम, महेश पिरला, सुधाकर कुरसाम, सरंजामी जनगाम, राजकुमार पिरला, श्यामसुंदर गावडे आदी उपस्थित होते.
बाॅक्स
पर्यटक व विद्यार्थ्यांसाठी साेय
सिरोंचातून सकाळी ७.१५ वाजता ही बस निघून ८.३० वाजताच्या सुमारास सोमनूर येथे पाेहाेचणार आहे. तसेच सकाळी ९ वाजताच्या सुमारास पुन्हा सिरोंचाकडे परत जाणार आहे. बसफेरीमुळे शालेय विद्यार्थी, पर्यटक व भाविकांसाठी साेय झाली आहे. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालयी जाण्यासाठी या भागातील लोकांना नेहमी ऑटो किवा ११ किमीची पायपीट करावी लागत हाेती. परंतु आता बसफेरी सुरू झाल्याने भाविक, नागरिक व विद्यार्थ्यांना साेयीचे झाले आहे.