जिल्ह्यात ठिकठिकाणी दत्त जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:58+5:302020-12-31T04:33:58+5:30
कुरखेडा : तालुक्यातील उराडी व साेनेरांगी येथे मंगळवारी दत्त जयंती साजरी करण्यात आली. मंदिरात भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम ...
कुरखेडा : तालुक्यातील उराडी व साेनेरांगी येथे मंगळवारी दत्त जयंती साजरी करण्यात आली. मंदिरात भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. गाेपालकाला फाेडून भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दरम्यान आ. कृष्णा गजबे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
सिराेंचा : येथील पाेलीस ठाण्याच्या आवारातील दत्त मंदिरात दत्त जयंती साजरी करण्यात आली. सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली हाेती. दरवर्षीप्रमाणे पूजाअर्चा, अभिषेक करून हवन करण्यात आले. तसेच व्यंकटेश्वर मारगाेनी कुटुंबाकडून पूजा, अभिषेक करण्यात आला. कार्यक्रमाला उपविभागीय पाेलीस अधिकारी प्रशांत स्वामी, ठाणेदार अजय अहीरकर, व्यंकटेश्वर मारगाेनी, मधुसागर कंबगाैनी, सतीश रंगुवार, वामन गाैड आदींनी सपत्नीक हवन केले. कार्यक्रमाचे पाैराहित्य सचिन वेदांतम यांनी पार पाडले. कार्यक्रमाला बहुसंख्य भाविक उपस्थित हाेते.
वैरागड : करपडा मार्गावरील दत्त मंदिरात दत्त जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने भजन करण्यात आले. गाेपालकाला फाेडून भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण राऊत, छाेटू हडप, अभिषेक चाैधरी, अखिल डुंबरे, साहिल डुंबरे, रितेश राऊत, अभिजित तावडे, चिंतामण कामतकर यांनी सहकार्य केले.
देसाईगंज : देसाईगंजसह तालुक्यातील बाेडधा येथे दत्त जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने प्रवचन, कीर्तन पार पडले. कार्यक्रमाला आ. कृष्णा गजबे, माजी पं. स. सभापती परसराम टिकले, माेहन गायकवाड, सुनील पारधी, पंढरी नखाते, कैलास राणे उपस्थित हाेते.