जीवंत महिलेचे डेथक्लेम उचलणारा मोकाटच
By admin | Published: October 10, 2016 12:57 AM2016-10-10T00:57:58+5:302016-10-10T00:57:58+5:30
जीवंत महिलेला मृत दाखवून तिच्या नावाने असलेली एलआयसीची रक्कम हडप करणारा आरोपी मोकाटच आहे. त्याला अटक करावी,
पत्रकार परिषद : गडचिरोली पोलिसांचे दुर्लक्ष
आष्टी : जीवंत महिलेला मृत दाखवून तिच्या नावाने असलेली एलआयसीची रक्कम हडप करणारा आरोपी मोकाटच आहे. त्याला अटक करावी, अशी मागणी पीडित महिला व तिच्या मुलाने रविवारी पत्रकार परिषदेत केली आहे.
राळापेठ येथील साधना किसन पिंपळशेंडे हिने गावातीलच विमा प्रतिनिधी कृष्णा पवित मंडल हिच्यामार्फतीने विमा काढला होता. मात्र या पॉलिसिमध्ये विशेष फायदा मिळत नसल्याने पॉलिसी विड्रॉल करण्यास सांगितले. प्रतिनिधीच्या सांगण्यानुसार साधना पिंपळशेंडे यांनी पॉलिसीचा बॉन्ड पेपर व भरलेल्या पावत्या प्रतिनिधीकडे दिल्या. एका महिन्यात रक्कम जमा होईल, असे सांगितले. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही रक्कम जमा झाली नाही. एलआयसी कार्यालय गडचिरोली येथे विचारणा केली असता, डेथक्लेम देण्यात आल्याचे सांगितले. प्रतिनिधी मंडल यांनी बनावट दाखले जोडून पॉलिसीचे ३ लाख ३२ हजार रूपयांच्या रकमेची उचल केली आहे. सदर प्रकरण गडचिरोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र अजूूनपर्यंत प्रतिनिधीला अटक करण्यात आली नाही, प्रतिनिधीला अटक करून आपली रक्कम परत करावी, अशी मागणी साधना पिंपळशेंडे व अक्षय पिंपळशेंडे यांनी दिली आहे.