मेलेल्या जनावरांमुळे दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:35 AM2021-03-06T04:35:03+5:302021-03-06T04:35:03+5:30
सदर घटना धानोरा-मुरुमगाव मार्गावर ढवळीजवळची आहे. जनावरांना रस्त्याच्या कडेला फेकून दिले, त्यामुळे त्याची दुर्गंधी सुटली आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना ...
सदर घटना धानोरा-मुरुमगाव मार्गावर ढवळीजवळची आहे.
जनावरांना रस्त्याच्या कडेला फेकून दिले, त्यामुळे त्याची दुर्गंधी सुटली आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. धानोरा तालुका नक्षलग्रस्त असल्याने येथील पोलिसांना रात्रीच्या सुमारास बहार फिरण्यास बंदी आहे. याचा गैरफायदा गाेतस्करांनी घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी जनावरे म्हातारे झाले की, तस्करांना विकून टाकतात. तस्कर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावर दाटीवाटीने भरून नेत असतात. त्यामुळे अनेकदा जनावर रस्त्यातच मरण पावतात. अशा वेळी त्यांना रस्त्यात फेकून दिले जाते.
मागील काही वर्षांपासून धानाेरा तालुक्यातील जनावरांची माेठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. त्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील पशुधन कमी हाेण्यास सुरुवात झाली आहे. तस्करांवर कडक कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.