कोरोना काळात जन्मलेल्या २४ बालकांमध्ये व्यंगत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:25 AM2021-06-24T04:25:00+5:302021-06-24T04:25:00+5:30
गडचिराेली : कोरोनाकाळातील लॉकडाऊन, वाहतूक बंद असण्याचा फटका अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे बसला. त्यात या काळात जन्माला आलेल्या बालकांचाही समावेश ...
गडचिराेली : कोरोनाकाळातील लॉकडाऊन, वाहतूक बंद असण्याचा फटका अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे बसला. त्यात या काळात जन्माला आलेल्या बालकांचाही समावेश आहे. गरोदरपणाच्या काळात वेळोवेळी करावी लागणारी रक्त तपासणी आणि साेनाेग्राफी करण्यासाठी जाणे शक्य न झाल्यामुळे पोटात वाढणारे अपत्य सुदृढ आहे किंवा नाही हे त्यांना कळू शकले नाही. परिणामी जिल्ह्यात २४ बालकांना व्यंगत्व घेऊन जन्म घ्यावा लागला.
काेराेनाच्या संकटकाळात दिरंगाई झाल्याने आणि संबंधित कुटुंबीयांचा दुर्लक्षितपणा आणि असहायता याचा फटका त्या बालकांना आयुष्यभर सहन करावा लागणार आहे. गडचिराेली येथील जिल्हा व महिला बाल रुग्णालयात वर्षभरात २४ व्यंग असलेले बाळ जन्माला आले आहेत.
विवाहित महिलेला गर्भधारणा झाल्यापासून तिच्यासह तिच्या कुटुंबीयांना अतिशय काळजी घ्यावी लागते. आहार, विहार, आराेग्यासह सकारात्मक विचारही ठेवावे लागतात. त्यात काेराेना संसर्गाच्या महामारीदरम्यान गर्भवती महिलांना अतिशय दक्ष राहावे लागले. गडचिराेली जिल्ह्याच्या शहरी भागातील आराेग्य यंत्रणा काेराेनाच्या काळात दक्ष हाेती. मात्र ग्रामीण व अतिदुर्गम भागातील गर्भवती महिला आवश्यक असलेल्या रक्त चाचण्या व साेनाेग्राफी तपासणीसाठी प्राथमिक आराेग्य केंद्रात वेळेवर पाेहाेचू शकल्या नाही. परिणामी काही महिलांची प्रसूती अडचणीची ठरली. काहींचे बाळ व्यंगत्व घेऊन जन्मल्याचे दिसून येत आहे.
सुदृढ व निकाेप बाळ जन्माला येण्यासाठी गर्भधारणेच्या काळात वेळाेवेळी रक्त चाचण्या व साेनाेग्राफी तपासणी करून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधाेपचार व काळजी घेणे गरजेचे आहे. पण बस आणि इतर प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना तपासणीसाठी जाणे शक्य झाले नाही.
बाॅक्स...
वर्षभरात जिल्हा महिला रुग्णालयात झालेल्या प्रसूती - ५,१९९
किती बालकांमध्ये व्यंग - २४
बाॅक्स ....
चाचणी आवश्यकच
गर्भधारणेच्या काळात विविध प्रकारच्या रक्त चाचण्या व तपासण्या करणे आवश्यक आहे. त्याशिवाय गर्भातील बाळ कसे आहे, त्याची वाढ हाेत आहे का, महिलेची प्रकृती कशी आहे. हे सर्व या तपासण्यांमधून कळते. आराेग्य विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला आठवड्यातील काही दिवस गर्भवती मातांच्या तपासणीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
काेट .....
गर्भवती मातांनी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक त्या रक्तचाचण्या व साेनाेग्राफी तपासणी करणे गरजेचे असते. साेनाेग्राफी तपासणीतून बाळाची वाढ, हृदयाचे ठाेके व इतर बाबी कळतात. सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी व प्रसूती सुलभ हाेण्यासाठी पाैष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. काेराेना महामारीच्या काळात वर्षभरामध्ये जिल्हा महिला रुग्णालयात एकूण ५ हजार १९९ गर्भवती महिलांच्या प्रसूती झाल्या. यापैकी २४ मातांच्या बाळांमध्ये जन्म दाेष आढळून आले. त्यांनी रक्त चाचणी आणि सोनोग्राफी वेळेवर केली असती तर तेही टाळता आले असते.
- डाॅ. दीपचंद साेयाम, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिराेली.