मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 08:43 PM2020-03-10T20:43:08+5:302020-03-10T20:43:22+5:30
गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र मदत मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
गडचिरोली : मासोळ्या पकडण्यासाठी तलावावर गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील खरमतटोला या गावात घडली.
सुरेश मोतीराम कुमरे (४५) रा.खरमतटोला असे मृतकाचे नाव आहे. तो सकाळी मासोळ्या पकडण्यासाठी गावालगत असलेल्या तलावात गेला होता. तलावाच्या पाळीवरून चालताना त्याचा तोल गेल्याने तो खोल पाण्यात पडला. गाळात त्याचे पाय फसल्याने त्याला बाहेर पडता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र मदत मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कुरखेडा पोलिसानी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे आणला. घटनेचा तपास ठाणेदार सुधाकर देडे, एपीआय समीर केदार यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक शितल माने करीत आहे.