चिखली व आरमाेरीतील दाेन काेराेना बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 05:00 AM2020-11-02T05:00:00+5:302020-11-02T05:00:11+5:30

  लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील ४५ वर्षीय महिला व आरमाेरी येथील ७७ वर्षीय पुरूष ...

Death of the victims in Chikhali and Armory | चिखली व आरमाेरीतील दाेन काेराेना बाधितांचा मृत्यू

चिखली व आरमाेरीतील दाेन काेराेना बाधितांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे१३७ नवीन बाधित, ७९ कोरोनामुक्त, एकूण रूग्णांची संख्या पाेहाेचली ६ हजारांच्या जवळपास

  लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील ४५ वर्षीय महिला व आरमाेरी येथील ७७ वर्षीय पुरूष या दाेघांचा काराेनामुळे मृत्यू झाला आहे. तर १३७ नवीन रूग्णांची भर पडली आहे. ७९ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 
जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित ५ हजार ९५४ काेराेना रूग्णांपैकी ४ हजार ९९३ जणांनी काेराेनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण ५९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १५.१५ टक्के तर मृत्यू दर ०.९९ टक्के झाला.
अहेरीतील १७ स्थानिक व नागेपल्लीतील ३ जणांचा समावेश आहे. आरमोरीतील १० स्थानिक, भाकरोंडी १, देऊळगाव १, वैरागड १ जणांचा समावेश आहे. भामरागड बँक ऑफ महाराष्ट्र १, स्थानिक ८, हलेवर ३, कोठी १ व तहसिल कार्यालय २ जणांचा समावेश आहे. चामोर्शी मध्ये अनकोडा १, इल्लूर २, शहर १, दुर्गापूर १, घोट १, जयरामपूर १, कृष्णानगर १, लालडोंगरी १ जणांचा समावेश आहे. कोरची येथील ३ स्थानिक आहेत. कुरखेडा तालुक्यात कढोली ३, स्थानिक ३, रामगड १ जणाचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील बोरेपल्ली १, छुट्टुगंटा लगाम २ जणांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यात पंचायत समिती २, पोलीस स्टेशन १, झिंगनूर १ व रांगेपल्ली १ जणाचा समावेश आहे. देसाईगंज शहरातील कन्नमवार वार्ड १, कोरेगाव १, सीआरपीएफ ३, आरततोंडी १, भगतसिंग वार्ड १, तुकूम १ व शहरातील इतर १ जणाचा समावेश आहे.

गडचिराेली तालुक्यात आढळले ५१ रूग्ण
गडचिरोली तालुक्यातील बाधितांमध्ये पोटेगाव रोड १, इंदिरानगर १, म्हाडा कॉलनी १, आनंदनगर १, बसेरा कॉलनी १, नवेगाव १३, कॅम्प एरिया १, चामोर्शी रोड १, सीआरपीएफ २, धुंडेशिवनी १, फुलेवार्ड १, शहर इतर २, गणेशनगर १, जीएनएम होस्टेल १, गोकुळनगर ५, विद्यापीठ १, आयटीआय चौक १, रामनगर १, रामपुरी वार्ड २, रेव्हून्यू कॉलनी १, सदगुरू नगर १, साईनगर नवेगाव २, सर्वोदया वार्ड १, सोनापूर कॉ. १, एसपी कार्यालय १, सुयोग नगर १, टी पाँईंट १, टेंभा १, वनश्री कॉलनी १, इतर जिल्हा १, गांधी वार्ड १ जणांचा समावेश आहे. 

Web Title: Death of the victims in Chikhali and Armory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.