एकाच गावातील युवक व वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 05:00 AM2020-11-06T05:00:00+5:302020-11-06T05:00:14+5:30

जिल्ह्यातील आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६ हजार ३२४ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ३४५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या ९१७ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकुण ६२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.५२ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १४.५० टक्के तर मृत्यू दर ०.९८  टक्के एवढा आहे.

Death of a young man and an old man in the same village | एकाच गावातील युवक व वृद्धाचा मृत्यू

एकाच गावातील युवक व वृद्धाचा मृत्यू

Next

n  लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनामुळे आरमाेरी तालुक्यातील माेहझरी येथील २३ वर्षीय युवक व ७० वर्षीय नागरिकाचा काेराेनामुळे मृत्यू झाला.नव्याने ९२ बाधित आढळून आलेतर ८८ जणांनी काेराेनावर मात केली आहे.
जिल्ह्यातील आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६ हजार ३२४ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ३४५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या ९१७ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकुण ६२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.५२ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १४.५० टक्के तर मृत्यू दर ०.९८  टक्के एवढा आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कोटगुल १, साईनगर ६, इंदिरानगर १, कन्नमवार वाॅर्ड ३, गोकुलनगर १, विसापुर हेटी १, मेडिकल कॉलनी १, टेंभा १, नवेगाव कॉम्पलेक्स ३, बोदली १, कोटगल १, फुले वाॅर्ड १, आशिर्वादनगर १, गांधी वाॅर्ड १, स्थानिक २, कॅम्प एरिया १, वनश्री कॉलनी १, वसा १, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये आलापल्ली १, स्थानिक २, सीआरपीएफ बटालियन मधील १, करमपल्ली १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये देऊळगांव १, मोहझरी १, स्थानिक ६, वैरागड १, किटाडी ट्रेनिंग सेंटर (पोलीस)१, भामरागड तालुक्यातील बाधितांमध्ये कुक्कामेटा १, स्थानिक १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ३, हनुमान वाॅर्ड १, राममोहनपुर १, वायगाव १, आष्टी १, हनुमाननगर १, धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक २, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ६, अलदांडी ३, हालेवारा २, इंदिरा वार्ड १, कोरची तालुक्यातील बाधितांमध्ये टेंबली १, भिमपुर १, कोटगुल १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, अंगारा ३,  सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये रायपेठा १, स्थानिक ६, रंगाय्यापल्ली १, वियामपल्ली १ व देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये आयडीबीआय बँक कुरुड जवळ १, जवाहर वाॅर्ड २, कोरेगाव २, अरततोंडी १, विसोरा १, यांचा समावेश आहे. तसेच इतर जिल्ह्यातील १ जणाचा समावेश आहे. 
मागील दाेन महिन्यांपासून रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. दरदिवशी १०० रूग्णांची भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.

नवीन काेराेनाबाधित व काेराेनामुक्त
गडचिराेली तालुक्यात सर्वाधिक २९ रूग्ण आढळून आले. नवीन ९२ बाधितांमध्ये गडचिरोली २९, अहेरी ६, आरमोरी १०, भामरागड २, चामोर्शी ८, धानोरा २, एटापल्ली १२, कोरची ३, कुरखेडा ४, मुलचेरा ०, सिरोंचा ९ व वडसा येथील ७ जणांचा समावेश आहे. 
आज कोरोनामुक्त झालेल्या ८८ रूग्णांमध्ये गडचिरोली ३१, अहेरी १६, आरमोरी ६, भामरागड १, चामोर्शी १०, धानोरा १, एटापल्ली ३, मुलचेरा १, सिरोंचा २, कोरची ० व कुरखेडा ३, व वडसा मधील १४ जणाचा समावेश आहे.

 

Web Title: Death of a young man and an old man in the same village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.