कर्जमाफीची प्रक्रिया आणखी किचकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:54 AM2017-09-07T00:54:54+5:302017-09-07T00:55:08+5:30
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जातील माहिती आणि बँकांकडे असलेली त्या शेतकºयांची ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जातील माहिती आणि बँकांकडे असलेली त्या शेतकºयांची माहिती याची पडताळणी केल्यानंतरच कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकºयाला पात्र ठरविले जाणार आहे.
शेतकºयांकडील दीड लाखांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यानंतर त्यासाठी कोण-कोणते शेतकरी पात्र ठरू शकतात याची मोठी नियमावली आधीच बँकांना पाठविण्यात आली. त्यानुसार जे शेतकरी कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र ठरू शकतील अशांची सविस्तर माहिती शासनाकडे सादर करण्यास बँकांना सांगण्यात आले. त्यात सुरूवातीला प्रत्येक कर्जदार शेतकºयाशी माहिती ३४ कॉलममध्ये मागविण्यात आली होती. नंतर त्यात वाढ करून ५४ कॉलममध्ये माहिती मागविण्यात आली. आता २८ आॅगस्टला त्यात पुन्हा वाढ करून ६६ कॉलममध्ये माहिती सादर करण्यास सांगितले आहे.
या माहितीत शेतकºयासोबत त्याच्या परिवाराची माहिती, आधार क्रमांक, गावांचा पीन कोड, कर्जदार मरण पावला असल्यास वारसदारांची माहिती अशी तब्बल ६६ प्रकारची माहिती भरायची आहे. बँकांसाठी हे काम अतिशय किचकट आणि डोकेदुखीचे झाले आहे. या माहितीत गरज नसताना शेतकरी कोणत्या प्रवर्गातील (एससी/एसटी) आहे याचीही माहिती मागितली आहे.
जिल्ह्यात ३४ हजार ४२७ कर्ज थकबाकीदार शेतकरी आहेत. याशिवाय नियमित कर्जची परतफेड करणारे शेतकरी वेगळे आहेत. त्या सर्वांची माहिती शासनाने दिलेल्या तक्त्यानुसार तयार करून ती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २८ हजार शेतकºयांची माहिती तयार झाली असल्याची माहिती लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली.
अशी होईल पडताळणी
थकबाकीदार आणि नियमित कर्ज भरणारे अशा सर्व शेतकºयांची माहिती बँकांना ६६ कॉलमच्या एक्सेल शिटमध्ये भरून ‘आपले सरकार’ या सरकारी पोर्टलवर टाकायची आहे. याशिवाय शेतकरी आॅनलाईन पद्धतीने कर्जमाफीसाठी अर्ज करताना आपली माहिती सादर करतील. बँकांनी पाठविलेली माहिती आणि शेतकºयांनी अर्जासोबत जोडलेली माहिती याची पडताळणी करून ती माहिती जुळत असेल तरच त्या शेतकºयाला कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र ठरविले जाणार आहे. थकबाकीदार शेतकºयांकडे ९४ कोटी रुपये थकित आहेत.
डिसेंबरनंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ
शासनाने कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी लादलेल्या अटी, हवी असलेली माहिती गोळा करून ती विशिष्ट तक्त्यानुसार भरून पाठविणे, त्यांची पडताळणी करणे या कामासाठी किमान पुढील दोन ते तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या आधी कर्जमाफीचा लाभ पदरी पडणे कठीण आहे.
प्रत्येक पात्र शेतकºयाला दीड लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र ज्यांच्याकडे दीड लाखापेक्षा जास्त रक्कम थकित आहे त्यांना दीड लाखाच्या वरील सर्व थकीत रक्कम आधी भरावी लागणार आहे. त्याशिवाय कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही हे विशेष.