१४ ला मार्कंडा यात्रेबाबत हाेणार निर्णय; भाविक प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 05:46 PM2022-02-11T17:46:06+5:302022-02-11T17:50:12+5:30

मार्कंडा जत्रेबाबत याेग्य ताे निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १४ फेब्रुवारी राेजी साेमवारी मार्कंडादेव येथे सभेचे आयाेजन केले आहे.

Decision will be taken on 14th regarding Markanda Yatra | १४ ला मार्कंडा यात्रेबाबत हाेणार निर्णय; भाविक प्रतिक्षेत

१४ ला मार्कंडा यात्रेबाबत हाेणार निर्णय; भाविक प्रतिक्षेत

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मार्कंडादेव येथे सभा

चामाेर्शी (गडचिरोली) : यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव येथे जत्रेचे आयाेजन करायचे की नाही, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी मार्कंडादेव येथे जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची सभा आयाेजित करण्यात आली आहे. या सभेत जत्रा आयाेजित करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते. या जत्रेला लाखाे भाविक येतात. मागील वर्षी काेराेनाच्या संकटामुळे जत्रा रद्द करण्यात आली हाेती. यावर्षीही काेराेनाची तिसरी लाट सुरू आहे. मात्र या लाटेचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. काेराेना रुग्ण आढळून येत असले तरी ते घरीच उपचार करून बरे हाेत आहेत. त्यामुळे काेराेनाविषयीची भीती नागरिकांच्या मनातून निघून गेली आहे. शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत. शासनामार्फतही हळूहळू नियम शिथिल केले जात आहे. या परिस्थितीचा विचार बैठकीत केला जाणार आहे.

१ मार्च राेजी महाशिवरात्री आहे. आठ दिवसांच्या जत्रेत काेट्यवधी रुपयांची उलाढाल हाेते. हजाराे नागरिकांना यातून राेजगार मिळते. त्यामुळे जत्रेचे आयाेजन करण्यास काहीच हरकत नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मंडईंमध्ये उसळत आहे गर्दी

गडचिराेली जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांमध्ये जानेवारी महिन्यापासून मंडईचे आयाेजन केले जाते. यावर्षीही मंडई भरविली जात आहे. माेठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळत आहे. मात्र मंडईमुळे काेराेना वाढला, असे चित्र सध्यातरी दिसत नाही. मार्कंडा जत्रा ही सर्वांत माेठी जत्रा आहे. या ठिकाणी काेराेनाचे थाेडेफार नियम पाळून जत्रेचे आयाेजन करण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

मार्कंडा जत्रेबाबत याेग्य ताे निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १४ फेब्रुवारी राेजी साेमवारी मार्कंडादेव येथे सभेचे आयाेजन केले आहे. या सभेला सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बाेलाविण्यात आले आहे. सर्व अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून जिल्हाधिकारी याेग्य ताे निर्णय घेतील.

- संजय नागतिळक, तहसीलदार, चामाेर्शी

Web Title: Decision will be taken on 14th regarding Markanda Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.