आरमोरी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:35 AM2021-08-29T04:35:19+5:302021-08-29T04:35:19+5:30
यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या; परंतु सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. ...
यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या; परंतु सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. सध्या तलाव, बोड्या रिकाम्या आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या धान रोवणीची कामे खोळंबली असून हलक्या धानाचे पऱ्हे हे निसवण्याच्या मार्गावर आहेत. ज्या तलाव, बोड्यांमध्ये थोडेफार पाणी साचलेले होते त्या पाण्याने शेतकऱ्यांनी कशीबशी धानाची रोवणी केली; परंतु गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रोवणी झालेले धानपीक करपण्याच्या स्थितीत आहे. शासनाने तालुक्यातील शेतजमिनींचे पंचनामे करून लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आरमोरी तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. तहसीलदारांना निवेदन देताना युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, भूषण सातव, लहानू पिलारे, रामदास डोंगरवार, पुंजीराम मेश्राम, माजी जि. प. सदस्य वेणू ढवगाये, नगरसेवक माणिक भोयर, कवळू सहारे, मेघा मने, शैलेश ढोरे, विजय मुर्वतकार, शैलेश चिटमटलवार, अनिल पारधी, उल्हास बनपूरकर, वसंत गेडाम, ज्ञानेश्वर ढवगाये, राजू ढोरे, किशोर मेश्राम, सतीश गुरनुले, टिकाराम खेवले आदी उपस्थित होते.
270821\0951img-20210827-wa0039.jpg
आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करताना सेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते